Anushka Sharma  Google
मनोरंजन

अनुष्का प्रेग्नेंट ही अफवाच; फिजिओथेरपिस्टकडे गेलेली अभिनेत्री,कारणही समोर

हॉलिडेहून परत आल्यानंतर अनुष्का-विराट यांनी तातडीनं रुग्णालय गाठलं होतं त्यामुळे त्यांचे चाहते मात्र चिंतेत पडले आहेत.

प्रणाली मोरे

अनुष्का शर्मा(Anushka Sharma) दुसऱ्यांदा प्रेग्नेंट(Pregnant) आहे अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली होती,पण आता कळतंय ती निव्वळ अफवाच होती. मालदीवहून परत आल्यानंतर अनुष्का आणि विराटनं तातडीनं रुग्णालय(Hospital) गाठल्यानं चाहते थोडे चिंतेत होते. पण जेव्हा दोघांचा रुग्णालयाबाहेर पडतानाचा हसरा चेहरा सगळ्यांनी पाहिला तेव्हा चाहत्यांनी आनंदात चक्क स्वघोषित करुन टाकलं की त्यांची लाडकी अभिनेत्री अनुष्का प्रेग्नेंट आहे. अन् मग काय बातमीला जणू पाय लागल्यासारखी ती इकडून-तिकडे पळत सुटली. पण आता कानावर पडतंय की मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अनुष्का आणि विराट फिजिओथेरपिस्टकडे गेले होते,पण का?(Anushka Sharma is NOT pregnant with second child; She went to see a Physiotherapist)

कोकिलाबेन अंबानी रुग्णालयही अनु्ष्का प्रेग्नेंट आहे ही बातमी पसरल्यानं चर्चेत आलं होतं. सोशल मीडियावर अनुष्का-विराटसोबत कोकिलाबोन रुग्णालयाची देखील हवा झालेली आपण पाहिली. पण तिथे अनुष्का फिजिओथेपरिस्टकडे का गेली होती या कारणाचा खुलासा झाला आहे.

अनुष्काचा लवकरच 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा येत आहे. ज्यात ती महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी यांची भूमिका साकारत आहे. यात ती आपल्याला जोरदार गोलंदाजी करताना दिसणार आहे. आता हा रोल स्पोर्टवूमन नसलेल्या अनुष्कासाठी खूपच चॅलेंजिंग असणार यात शंकाच नाही. अशामध्ये सीनसाठी का होईना पण खरोखरची गोलंदाजी तिला करावी लागतेय अन् त्यामुळे मग शरीराची जी काळजी गरजेनुसार घ्यावी लागते हे सगळं तिलाही करावं लागत आहे सध्या. स्ट्रेचिंग,रनिंग,डायव्हिंग हे सगळं आलंच एखादा खेळ खेळताना त्यामुळे शरीराला त्यासाठी तयार ठेवणं,त्यामुळे होणाऱ्या दुखण्याला कंट्रोलमध्ये ठेवणं या गोष्टी देखील कटाक्षाने पाळाव्या लागतात.

अनुष्काही आता 'चकदा एक्सप्रेस'साठी स्वतःला तयार करतेय. कारण झुलन गोस्वामी या फास्ट बॉलर होत्या आणि आता त्यांची भूमिका करायची म्हणजे अनुष्काला हे सगळे कष्ट घ्यावेच लागणारच नाही का. तिने स्वतःही गोलंदाजीच्या प्रॅक्टीसचे फोटो शेअर केले होते काही-दिवसांपूर्वी. आणि हेच कारण आहे की सध्या तिचं फिजीओथेपरपिस्टकडे जाणं थोडं वाढलं आहे. आणि म्हणूनच तिनं तातडीनं कोकिलाबेन अंबानी रुग्णालय गाठलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT