Anushka Sharma  esakal
मनोरंजन

Anushka Sharma: अनुष्काची टू व्हीलरवर सवारी ! पण चाहते नाराज; केली थेट मुंबई पोलिसांकडे तक्रार

Vaishali Patil

अनुष्का शर्मा ही नेहमीच तिच्या हटक्या लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख अनुष्कानं तयार केली आहे. आज तिची वेगळ्या कारणामुळे चर्चा रंगली आहे.

अनुष्का शर्माचे नाव बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये सामील आहे. त्यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. अनुष्काने तिच्या मेहनत आणि धैर्याच्या बळावर स्वतःला सिद्ध केले आहे. ती कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही.

मात्र अनुष्काचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे नेटकरी तिला ट्रोल करु लागले आहेत. त्याच झालं असं की अनुष्का मुंबईत स्पॉट झाली. यावेळी पापराझींनी तिचा व्हिडिओ काढला आणि तो शेअरही केला.

अनुष्का एका डबिंग स्टुडिओबाहेर दिसली. यावेळी ती तिचा बॉडिगार्ड सोनुसोबत जुहूमध्ये बाईक राईड करतांना दिसली. तिची स्टाईल नेटकऱ्यांनी भलतिच आवडली मात्र यावेळी अनुष्कांने एक चुक केली.

ती विना हेल्मट बाईकवर राईड करतांना दिसली. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला खुप ट्रोल केलं आहे. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नेटकऱ्यांनी तिला वाहतुकीचे नियम सांगितले आहे. इतकच नाही तर तिच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एकानं लिहिलयं की, 'ना मॅडमने हेल्मेट घातलयं ना तिच्या बॉडिगार्डने..', तर दुसऱ्यांने लिहिलयं की, 'मुंबईत हेल्मेट गरजेचं नाही का?', इतकच नाही तर एकानं लिहिलयं की, '@mumbaipolice काल अमिताभ बच्चन यांनी विना हेल्मेट पोस्ट केली होती. आज ह अनुष्काचा हा व्हिडिओ हे दोघंही विना हेल्मेट फिरण्याचा संदेश देत आहे. तुम्ही यांच्यावर कार्यवाही करा..'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT