AP Dhillon Trolled For Tiranga Shoes: 'ब्राऊन मुंडे' फेम रॅपर आणि गायक एपी ढिल्लन हा नेहमीच चर्चेत असतो. त्याची भारतासह जगभरातील देशांमध्ये मोठी फॅन फॉलोइंग आहे. एपी ढिल्लन सध्या भारतात 'एपी ढिल्लन: फर्स्ट ऑफ अ काइंड' या डॉक्यु सीरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.
नुकतच याची स्क्रीनिंग झाली ज्यात सलमान खान, रणवीर सिंग, हार्डी संधू, रॅपर बादशाह डॉक्यु सीरीजच्या स्क्रीनिंगमध्ये दिसले. मात्र सध्या एपी ढिल्लन खुपच ट्रोल होत आहे. यावेळी तो त्याच्या लूकमुळे ट्रोल झाला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंग्याचे कपडे परिधान करण्याचा ट्रेंड प्रत्येकजण फॉलो करतो, पण एपीने असे कपडे नाही तर असे शुज घातले आहे की ज्यामुळे तो ट्रोल होत आहे.
'ए,क्सक्यूज' ते 'ब्राउन मुंडे' पर्यंतच्या गाण्यांनी त्याने लोकांना वेड लावलं आहे. दरम्यान 15 ऑगस्टपूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर त्याचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये तो तिरंग्याचा शूज घातलेला दिसत होता. एपी ढिल्लन आणि बनिता संधू यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
एपीचे हे तिरंग्याचे बूट पाहिल्यानंतर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. त्याने भारतीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप अनेकांनी त्याच्यावर केला आहे. काहींनी त्याला देशद्रोही आणि खलिस्तानी म्हटलं आहे तर काहींनी ते शुज बनवणाऱ्या कंपनीवरही कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
एका यूजरने लिहिले- 'हा प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लन आहेत. 15 ऑगस्टच्या आधी तो इंस्टाग्रामवर त्याचे बूट दाखवत आहे. तो जाणूनबुजून आपल्या तिरंग्याचा अपमान करत आहे का?'
तर दुसऱ्याने लिहिले की, ' तिथले प्रत्येक गायक खलिस्तानी आहे. एपी ढिल्लन आमच्या राष्ट्रध्वजाचा अनादर करत आहेत पण लोकांचा त्यावर आक्षेप नाही.'
तर एकानं लिहिलयं की, मला सेलिब्रिटींच्या डेटिंग आणि त्यांच्या फॅशन सेन्सची पर्वा नाही, परंतु फक्त छान दिसण्यासाठी अशा प्रकारचे त्यांच्या बुटांवर तिरंगा लावून राष्ट्रध्वजाचा अपमान हे छपरी सेलिब्रिटी करतात."
वाढता विरोध पहाता त्याने लगेचच ही पोस्ट सोशल मिडियावरुन डिलिट केली मात्र तोवर नेटकऱ्यांनी त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ते व्हायरल केले. आता तो खुपच ट्रोल होत आहे.
एपी ढिल्लन त्याच्या डॉक्युमेट्री सीरीज साठी चर्चेत आहे जी १८ ऑगस्टला प्राइमवर रिलीज होणार आहे. याचे दिग्दर्शन जय अहमद यांनी केले आहे. या सिरिजमध्ये तो त्याच्या गुरदासपूर ते कॅनडा या प्रवासाबद्दल सांगणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.