apurva nemlekar fighting and challenging moment in personal life Bigg Boss Marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: घडू नये ते घडलं आणि अपूर्वाने भल्याभल्यांची जिरवली.. हा किस्सा..

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर च्या आयुष्यातील हा किस्सा वाचून तुम्हीही म्हणाल तिचा नाद नाय..

नीलेश अडसूळ

apurva nemlekar: ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत आहोत तो क्षण आता अगदीच जवळ आला आहे. गेली 99 दिवस आपण बिग बॉस मराठीचा खेळ पाहत आहोत. अवघ्या एका दिवसात या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. त्या क्षणाची उत्सुकता आता चांगलीच वाढली आहे. अत्यंत दिमाखदार सोहळ्यात ही ट्रॉफी विजेत्याला दिली जाणार आहे. यामध्ये अपूर्वा नेमळेकर हे नाव विजेत्यांच्या यादीत आहे. म्हणूनच अपूर्वाचा एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अपूर्वा 93 दिवसांचा टप्पा पार करून बिग बॉसच्या मराठीच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचली. बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनाले मिळवून ती थेट टॉप फाइव्ह मध्ये गेली. या खेळासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली. जेजे आडवे आले त्या प्रत्येकाशी ती एकहाती भिडली. तिने केवळ राडाच घातला नाही तर मेघा, स्नेहलता यांच्याशी प्रेमाचे संबंधही जोपासले. अक्षयवर भावासारखं प्रेम केलं तर विकास आणि तिच्या मैत्रिणे प्रेक्षकांना वेड लावलं. अशी हर हुन्नरी अपूर्वा आता ट्रॉफी पासून फक्त एक पाऊल दूर आहे. ती घरात जशी वागली तशीच बाहेरही आहे. तिला चुकीच्या गोष्टी सहन होत नाही. अशीच एक गोष्ट तिच्यासोबत घडली. त्यावेळी अपूर्वाने चांगलाच लढा दिला होता.

एक वेळ अशी आली की तिला स्वतःच्या आत्मसन्मानासाठी लढाव लागलं. तो प्रसंगही तिने ‘सकाळ'च्या माध्यमातून सांगितला होता. ती म्हणाली होती, ''एक वेळ माझ्यावर अशी आली ही मला दुर्गेचं रूप धारण करावं लागलं. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेसाठी मी घेतलेले कष्ट, भूमिकेला दिलेला न्याय, कोकणात जाऊन केलेलं चित्रीकरण या सर्व गोष्टी उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत. पण एक प्रसंग असा आला की एवढं करूनही जेव्हा त्या मालिकेचे निर्माते म्हणाले की, ‘तुझ्या असण्या-नसण्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. आम्ही आमचं पात्र इतकं मोठं केलंय तुझ्याशिवायही मालिका चालू शकते.’ तेव्हा मात्र माझा संताप झाला.''

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

''जेव्हा माझ्या अस्तित्वावर. कामावर, मेहनतीवर बोट ठेवलं गेलं, माझा अपमान केला गेला तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता तिथून बाहेर पडले. मी माझ्या निर्मात्यांना ऐकवलं की, ‘एखादी गोष्ट चालतेय म्हणून लोचटासारखी काम करणारी मी नाही. मी माझी वेळ पुन्हा उभी करेन.''

''एवढं होऊनही या घटनेचं मी बाजारीकरण केलं नाही किंवा माध्यमांचा गैरवापर करून त्याचं भांडवल केलं नाही. फक्त जे प्रेक्षक माझ्यासाठी रात्रीच्या 11 वाजेपर्यंत मालिकेची वाट पहायचे, त्यांची दिशाभूल होऊन नये, त्यांच्या पर्यंत ही बाबा पोहोचावी म्हणून मी माझ्या सोशल मीडिया आकाऊंटवरुन माझं म्हणणं मांडलं. जेव्हा स्वतःच्या सन्मानाची गोष्ट येते तेव्हा तुम्हाला कणखर व्हावंच लागतं,'' अशा शब्दात तिने आपला संघर्ष मांडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT