Arati Ankalikar Tikekar Interview 
मनोरंजन

Arati Ankalikar Tikekar Podcast : 'फक्त मला पटवण्यापुरता तबला वाजवला, त्यानंतर कधीही....' आरती अंकलीकर अन् अभिनेता उदय काय होती यांची लवस्टोरी?

आरती अंकलीकर टिकेकर (Arati Ankalikar Tikekar Podcast) यांच्या त्या मुलाखतीमध्ये आपल्या प्रवासाविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

युगंधर ताजणे

Arati Ankalikar Tikekar Classical Singer : आरती अंकलीकर टिकेकर शास्त्रीय संगीतातलं मोठं नाव. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या सुरावटींनी श्रोत्यांना सुरानंद दिला आहे. केवळ भारतच नाही तर जगभरातील विविध संगीत महोत्सवांमध्ये भाग घेत आरतीजींनी आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केलं.

शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, सध्याचे नवोदित गायक अन् एकुणच गायन क्षेत्रातील परिस्थिती यावर आरती अंकलीकर यांनी केलेलं भाष्य खूप काही सांगून जाणारं आहे. सकाळच्या आमच्याकाळी....नावाच्या पॉडकास्टमध्ये (Amchya Kali Sakal Podcast) आरती अंकलीकर यांनी त्यांच्या आतापर्यतच्या गायन, संगीत प्रवासाच्या आठवणींचा पट यावेळी उलगडून दाखवला.

यामध्ये त्यांनी आवाजापेक्षा विचार महत्वाचा असे सांगून भविष्यामध्ये शास्त्रीय संगीताचं (Arati Ankalikar Tikekar Marathi News) असणारं स्वरुप, नवोदित गायक, त्यांची विचारशैली आणि या सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे श्रोता याविषयीही त्यांनी अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले आहेत.

मुलाखतीमध्ये आरती अंकलीकर यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली. आरती आणि त्यांचे पती प्रसिद्ध अभिनेता उदय टिकेकर यांची लवस्टोरी विषयी त्यांनी सांगितले आहे.

त्या आठवणींविषयी बोलताना आरतीताई म्हणाल्या की, मी आणि उदय आम्ही एका कॉलेजमध्ये होतो. तो तबला वाजवायचा. मी अगोदर रुईया कॉलेजमध्ये होते सहा महिने. पुढे मी सीए व्हायचं असं ठरवलं होतं. दरम्यान उदयशी ओळख झाली होती. तो कॉलेजमधील वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये भाग घेत असे. आम्ही बऱ्याचवेळा कॉलेजमध्ये एकत्र परफॉर्म केला. तो मला तबल्यावर साथ देत असे. त्यानं तेवढ्या वेळेपुरताच मला पटवण्यासाठी तबला वाजवला. पुढे कधीही त्यानं तबला वाजवला नाही.

माझ्या वेगवेगळ्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत तो नेहमीच तबल्यावर असायचा. त्या आठवणी फारच छान आहेत. आमच्या कॉलेजमधील कँटीनमध्येच गप्पा व्हायच्या. कारण पुढे मला किशोरीताईंकडे गाणं शिकण्यासाठी जायला लागे. मग तो मला बरोबर नऊ वाजता त्यांच्याकडे सोडत असे. असेही आरती अंकलीकर टिकेकर यांनी यावेळी सांगितले.

किशोरीताईंकडे सुरुवात...(Kishoritai Amonkar)

ताईंच्या समोर बसून त्यांनी सांगितलेल्या शिस्तीत गाणं हा एक वेगळाच अनुभव होता. आपल्या ड़ोक्यातील अनंत सांगितिक विचार त्यांना बाजुला सारुन आपल्याला हवा तो विचार समोर आणून तो शिस्तीत गाण्यातून गायचा. ताई हे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. ताई या संपूर्ण आवर्तन गायच्या. त्या पूर्ण आलाप म्हणणार आणि मग त्या आम्हाला म्हणायच्या की, आता तुम्ही गा....हे सगळं कमालीचं विलक्षण होतं. अशी आठवण आरती अंकलीकर टिकेकर यांनी यावेळी सांगितलं.

आवडते संगीतकार कोण?

लता दीदी, आशाताईंची गाणी नेहमीच मनात आहेत. एसडी बर्मन, आरडी बर्मन, मदन मोहन, शंकर जय किशन तसेच ए. आर.रहमान यांची गाणी आवडतात, काही वेळेला प्रितमची गाणीही ऐकते. श्रीधर फडके यांची गाणीही मला आवडतात. फ्युझन मी स्वत: गायले आहे. मला ते आवडते. पण फ्युझनचा स्वतंत्र कार्यक्रम करायचा म्हटलं की, त्यात मन फारसे रमत नाही. शास्त्रीय संगीतातून जे मन रमतं ते फ्युझनमध्ये होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांना नोटीस पाठवणाऱ्या चिल्लर आमदाराला जनताच जागा दाखवेल; बापूसाहेब पठारेंचा हल्लाबोल

Champions Trophy 2025: भारताचा ICC ने गेम केला ना भाऊ...! पाकिस्तानच असणार चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान, BCCI काय करणार?

Latest Maharashtra News Updates : इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी

"मालिकेची अजूनही असलेली लोकप्रियता आणि थ्री इडियटचं ऑडिशन"; नव्वदीमधील लाडका 'गोट्या' आता काय करतो घ्या जाणून

सुरज आता तो सुरज राहिला नाही... बारामतीमध्ये अंकिता वालावलकरला आला वाईट अनुभव, म्हणाली- त्याचं वागणं पाहून...

SCROLL FOR NEXT