अभिनेत्री, राजकारणी आणि बिग बॉस 16 फेम अर्चना गौतम आणि तिच्या वडिलांना दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर मारहाण झाल्याची घटना समोर आलीय. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, काही महिलांनी तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिला मारहाण केली आणि पक्षाच्या कार्यालयात प्रवेश रोखला.
संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी अर्चना गौतम यांनी तिच्या वडिलांसोबत कार्यालयात भेट दिली. त्यावेळी ही घटना घडली.
(Archana Gautam manhandled outside Delhi Congress office bigg boss actress archana gautam)
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये अर्चना गौतमला अनेक लोकांनी घेरले आहे, आणि ही लोकं तिच्यावर ओरडत आहेत. याशिवाय कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून तिची छेडछाड केली जात असुन तिला आणि तिच्या वडिलांना धक्काबुक्की केली जात असल्याचा आरोप आहे.
अर्चना गौतमने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. मारहाण केल्याप्रकरणी अर्चनाचे वडील वडील गौतम आज शनिवारी याप्रकरणी मेरठमध्ये गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. याशिवाय ते पत्रकार परिषद घेऊन मीडियाला याप्रकरणी संबोधित करु शकतात.
या वर्षी मार्चच्या सुरुवातीला, अर्चनाच्या वडिलांनी प्रियंका गांधी वाड्रा यांचे स्वीय सहाय्यक संदीप कुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्यावर तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता.
अर्चना गौतमच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि जातीयवादी शब्दही बोलले जात होते. आता मारहाण प्रकरणी अर्चना आणि तिचे वडील कोणतं पाऊल उचलणार, हे पाहायचं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.