मनोरंजन

सिद्धूची जागा घेणार 'अर्चना'! सोशल मीडियावर भन्नाट मीम्स

पंजाबमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय बदल होताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - पंजाबमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय बदल होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्या वेगानं त्या राज्यामध्ये राजकीय परिवर्तन होतं आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंजाबच्या कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन नवज्योत सिंग सिद्धू पायउतार झाले आहेत. त्यांनी दुपारी आपला राजीनामा कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्त केला आहे. त्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत भाजप प्रवेश केल्याची चर्चा रंगली आहे. यासगळ्या घटनेचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. मनोरंजन विश्वानं देखील त्याची दखल घेतली आहे. विशेषत कपिल शर्मा मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या सिद्धूंनी जेव्हा राजीनामा दिला. त्यानंतर तासाभरातच ते सोशल मीडियावर टेड्रींगचा विषय होते. यासगळ्या प्रकरणात आणखी एका व्यक्तीलाही जोरदारपणे ट्रोल करण्यात आले आहे.

द कपिल शर्मा कॉमेडी शो (kapil sharma show) मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या अर्चना पुरन सिंग (Archana Puran Singh) सध्या ट्रोल होताना दिसत आहे. त्यांना नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या शो मध्ये सिद्धू त्यांचे सहकारी होते. सिद्धू यांनी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर त्या शो ची धूरा अर्चना यांनी आपल्याकडे घेतली होती. आता सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. त्यावरुन त्यांना ट्रोल केले जात आहे. यापूर्वी अर्चना यांनी सिद्धू यांच्या निवडीवर त्यांचे अभिनंदन करताना, तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालात पण मोठ्या प्रमाणावर बूके मला मिळाले आहेत. असं सिद्धू यांना सांगितलं होतं. त्यावर सिद्धू यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले होते. आता नेटकऱ्यांनी सिद्धूंनी राजीनामा दिल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद झाला असेल, तर तो अर्चना सिंग यांना असं म्हटलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे मीम्सही व्हायरल झाले आहे.

त्या मीम्सला नेटकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, आता कॉग्रेसनं अर्चना पुरन सिंग यांची पंजाब कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करावी. कित्येकांनी बॉलीवूडच्या काही चित्रपटांमधील विनोदी प्रसंगाचे मीम्स तयार करुन सिद्धू आणि अर्चना पुरन सिंग यांना ट्रोल केले आहे. आणखी एकानं लिहिलं आहे, सिद्धूंचा राजीनामा आणि अर्चना पुरन सिंग यांना धक्का. अनेकांनी कॉग्रेसच्या राहूल गांधींना त्या पोस्ट टॅग करुन प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्चना यांच्या नावाचा विचार करण्याची विनंतीही केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT