Arjun Kapoor Latest News बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे. यामुळे मोठ्या स्टार्सचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर लोक बहिष्काराचा (Boycott) ट्रेंड चालवत आहेत. अशा परिस्थितीत बॉलिवूड स्टार्स आणि चित्रपटाशी संबंधित लोकांच्या अडचणी वाढत आहेत. आता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) बॉयकॉटच्या ट्रेंडवर मौन सोडले. मात्र, युजर्सनी त्याचीच लायकी काढली आहे.
अर्जुन कपूरने बॉलिवूडच्या बॉयकॉटबाबत सध्या सुरू असलेल्या ट्रेंडवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘यावर मौन धारण करून इंडस्ट्रीतील लोकांनी चूक केली आहे. ही आमची शालीनता होती. परंतु, लोकांनी त्याचा चुकीचा फायदा घेतला. आपले काम आपल्या बाजूने बोलेल असे मानून आपण चूक केली आहे. जी लोकं ट्रोलिंग आणि बहिष्काराची (Boycott) मागणी करीत आहे त्यांना अद्दल घडवावी लागेल’ असा बॉलिवूडचा अभिनेता अर्जुन कपूर म्हणाला होता.
मला वाटते आता आपण खूप सहन केलंय आणि लोकांनी त्याची सवय करून घेतली आहे. आपण एकत्र येऊन याबद्दल काहीतरी केले पाहिजे. कारण, जे लोक आपल्याबद्दल लिहितात आणि हॅशटॅग ट्रेंड होत आहेत त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. जेव्हा आपण एखादा चित्रपट करतो आणि तो बॉक्स ऑफिसवर चांगला चालतो तेव्हा लोक आपल्याला आपल्या आडनावामुळे नव्हे तर आपल्या कामामुळे पसंत करतात. आता जास्त होत आहे, असेही अर्जुन कपूर म्हणाला होता.
अर्जुनवर लोक संतापले
अर्जुनच्या (Arjun Kapoor) या वक्तव्यावर लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लोक अर्जुनला सुनावत आहेत. अर्जुनला ट्रोल करताना एका युजरने त्याचे आतापर्यंतचे सर्व फ्लॉप चित्रपट मोजून दाखवले. अर्जुन कपूरच्या करिअरमध्ये हिटपेक्षा जास्त फ्लॉप आहेत. तो बॉलिवूडला एक होण्यास सांगत आहे, असे एकाने म्हटले.
युजर्स म्हणाले...
अर्जुन कपूर जर नेपो किड नसता तर त्याला इतके चित्रपट मिळाले नसते.
एकाने अर्जुन कपूरला फक्त मलायका अरोराचा बॉयफ्रेंड सांगितलं
तुझ्या चित्रपटांपेक्षा मलायका अरोराच्या बॉयफ्रेंडच्या नावानेच तुला ओळखले जाते.
लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करू नको.
अर्जुन डिझास्टर चित्रपट बनवत राहील असेही युजरने लिहिले आहे.
लोक बॉलिवूडला नाकारत आहे
अर्जुन कपूरच्या वक्तव्यावर लोक ज्या प्रमाणात संताप व्यक्त करीत आहे. त्यामुळे बॉलिवूडबद्दल लोकांच्या मनातील स्थान संपत चालले आहे, हे स्पष्ट झाले आहे. लोक बॉलिवूडला वाईट पद्धतीने नाकारत आहेत. अशा परिस्थितीत हिंदी चित्रपटांच्या भविष्यासाठी ते धोकादायक ठरू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.