aroh welankar comment on eknath shinde and mahavikas aghadi in sakal unplugged podcast sakal
मनोरंजन

महाविकास आघाडी भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी, आरोह वेलणकरची टीका..

अभिनेता आरोह वेलणकरची महाविकास आघाडीवर सडकून टीका..

नीलेश अडसूळ

eknath shinde : महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाला आता पूर्णविराम लागलाय असं म्हणायला हरकत नाही. नुकतीच शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्काच म्हणावा लागेल. कारण गेली काही दिवस शिंदे यांचे बंड, गुवाहाटी दौरा या सगळ्याने मोठी राजकीय उलथपालथ निर्माण झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अडीच वर्षे सुरू असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. पण महाविकास आघाडीचे सरकार हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारेच होते असा आरोप अभिनेता आरोह वेलणकर याने केला आहे. तो सकाळ ऑनलाइन मध्ये दिलेल्या मुलाखतीत हे म्हणाला. (sakal unplugged) (aroh welankar comment on eknath shinde and mahavikas aghadi in sakal unplugged podcast) (aroh welankar on mahavikas aghadi)

अभिनेता आरोह वेलणकर हा कायमच भाजपला पाठिंबा देत आलेला आहे. त्याने अडीच वर्षात महाविकास आघाडीवर भरपूर टीका केली. तो त्याच्या ट्विटर अकाउंट वरून आपले विचार मांडत असतो. आजवर त्याने अनेक विषयांवर महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने 'महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय' अशी टीका त्याने केली होती. सकाळ unplugged या कार्यक्रमात तर त्याने महाविकास आघाडीवर थेट आरोप केले. अडीच वर्षात महाविकास आघाडीतील दोन नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जातात हे किती दुर्दैवी आहे. अजूनही कारवाया सुरूच आहेत. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे होते.' असं आरोह म्हणाला. याशिवाय त्याने सध्याच्या राजकीय परिस्थिती वर भाष्य केले. ते ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सकाळ unplugged या कार्यक्रमाद्वारे आरोहचं (Aroh velankar) म्हणणं ऐका.

अभिनेता आरोह वेलणकर हा अभिनयासोबतच सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. शिवाय राजकीय विश्वावरही तो भाष्य करताना दिसतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर तो बराच सक्रिय असतो. त्याचा पाठिंबा उघडपणे भाजप पक्षाला असल्याचे वारंवार दिसले आहे. तो केंद्र सरकारच्या पाठिंब्यासह महाविकास आघाडीवर अनेकदा टीका करत असतो. त्यात गेली काही दिवस महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर त्याने सकाळ पाॅडकास्ट मध्ये भाष्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT