Raju Sapte  file image
मनोरंजन

कला दिग्दर्शक राजू सापते आत्महत्या प्रकरणी एकाला अटक; पाच जणांवर गुन्हा

आरोपींमध्ये त्यांच्या बिझनेस पार्टनरचाही समावेश असून पोलिसांनी त्याला अटक केली.

मंगेश पांडे

कला दिग्दर्शक राजेश मारुती सापते यांच्या आत्महत्येप्रकरणी वाकड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये त्यांच्या बिझनेस पार्टनरचाही समावेश असून पोलिसांनी त्याला अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरु आहे. चंदन रामकृष्ण ठाकरे असे अटक केलेल्या बिझनेस पार्टनरचे नाव आहे. त्याच्यासह नरेश विश्वकर्मा (मिस्त्री), गंगेश्वर श्रीवास्तव (संजूभाई), राकेश मौर्य, अशोक दुबे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सापते यांच्या पत्नीने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपींपैकी श्रीवास्तव हे फिल्म स्टुडिओज सेटिंग्ज अँड अलाईड मजदूर युनियनचे सचिव तर मौर्य खजिनदार आहेत. दुबे हे ऑल इंडिया फिल्म एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष असून विश्वकर्मा हे कामगार आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी पुण्यातील राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी राजू यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी त्रास दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी या व्हिडीओमध्ये केला.

व्हिडिओमध्ये राजू यांनी सांगितले, 'मी आता कुठल्याही प्रकारची नशा केली नाही. मी पूर्ण विचाराने हा निर्णय घेत आहे. मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. लेबर युनियनचे राकेश मौर्या हे मला खूप त्रास देत आहेत. माझं कोणत्याही प्रकारचे पेमेंट त्यांच्याकडे थकीत नाही. सगळे पेमेंट मी दिलेले आहेत. माझे कोणतेही पैसे बाकी नाहीत. पण राकेश मौर्या यांनी युनियनमधील काही लेबर लोकांना मुद्दाम फोन करून त्यांच्याकडून हे वदवून घेत आहेत, की राजू सापतेंनी पैसे दिले नाही. नरेश मेस्सी यांनी मी कोणतेही पेमेंट आत्तापर्यंत बाकी ठेवलेले नाही असे राकेश यांना सांगितले. तरी देखील ते मला त्रास देत आहते. सध्या माझ्याकडे पाच प्रोजेक्ट आहेत. त्यातील एक प्रोजेक्ट मला त्यांच्यामुळे सोडावे लागले. कारण ते मला काम करू देत नाहीत. या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.'

आरोपींवर खंडणी, खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी, कट रचणे, विश्वासघात, फसवणूक व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ठाकरे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता १० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT