बॉलीवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) गेल्या काही दिवसांपासून शाहरुखवर(Shahrukh Khan) थोडे नाराज दिसत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी ही नाराजगी बोलून दाखवली आहे. दिग्गज अभिनेता आणि नेता शत्रुघ्न सिन्हा म्हणाले,''आर्यन खानला(Aryan Khan) जेव्हा पकडण्यात आलं होतं तेव्हा शाहरुखच्या मुलाला ना मी फक्त पाठिंबा दर्शवला तर मी त्याच्या समर्थनार्थ बोललो देखील होतो. पण त्यानंतर शाहरुखनं माझे धन्यवाद मानायला साधा फोन करणं देखील गरजेचं समजलं नाही''. आर्यन खानला आता एनसीबीनं ड्रग्ज केस प्रकरणात क्लीन चीट दिली आहे. जेव्हा गेल्या वर्षी आर्यनला एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं,तेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट शब्दात एनसीबीचा विरोध केला होता. म्हणाले होते,''एनसीबी कारण नसताना पुराव्या अभावी जाणूनबुजून आर्यनला त्रास देत आहे''.
ज्या-ज्या लोकांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये आर्यन खानला अटक झाली तेव्हा पाठींबा दर्शविला होता त्यात शत्रुघ्न सिन्हा देखील सामिल होते. २४ वर्षीय आर्यन खानला एनसीबीने आता क्लीन चिट दिली आहे. ''आर्यनच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले नाहीत,ज्यामुळे त्याला क्रुझ शिप ड्रग्ज केस प्रकरणात आरोपी ठरवलं जाऊ शकत नाही'' असं स्पष्ट शब्दातील निवेदन एनसीबीनं जारी केलं आहे. आता शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत आर्यनला क्लीन चिट मिळाली म्हणून आनंद व्यक्त केला पण सोबत शाहरुख खानवर नाराजगी देखील दर्शवली आहे.
शत्रुघ्न सिन्हा त्या मुलाखतीत म्हणाले आहेत,''एक पालक म्हणून मी शाहरुखचं दुःखं समजलं होतो. आर्यन खान केस प्रकरणात मला जे त्यावेळी करावसं वाटलं ते मी केलं. पण शाहरुखनं मला साधं थॅंक्यु कार्ड देखील पाठवलं नाही. मी खरंतर तेव्हा आर्यनला जेलमध्ये पाठवण्याच्या विरोधात मुंबईत ज्यांनी-ज्यांनी आवाज उठवला त्यांच्यापैकी एक होतो. माझी एक सवय आहे,मी नेहमी सत्याच्या बाजूने बोलतो. मी तेव्हा तेच केलं जे मला योग्य वाटलं. मला वाटलं आर्यनवर अन्याय होत आहे म्हणून मी आवाज उठवला. आता राहिला प्रश्न शाहरुखचा,तर त्यानं मला ना थॅंक्यू म्हटलं ना थॅंक्यू कार्ड पाठवलं''.
मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हांना,'तुम्ही शाहरुखशी यासंदर्भात बोललात का?' असं विचारलं तेव्हा ते म्हणाले,''नाही,मुळीच नाही. मी कशाला कॉल करू. मला त्याच्याकडून काही कामाची अपेक्षा नाहीय. त्याला मी संपर्क करावा एवढी मला गरज वाटत नाही. आणि शाहरुखनं माझ्याकडं याबाबतीत मदत मागितली नव्हती असं देखील शत्रुघ्न सिन्हा यांनी नमूद केलं आहे''.
शत्रुघ्न सिन्हा मोठ्या पडद्यावर शेवटचे आपल्याला २०१८ साली 'यमला पगला दीवाना-फिर से' या सिनेमात नजरेस पडले होते. केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचे सरकार होते तेव्हा शत्रुघ्न सिन्हा मंत्री देखील होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.