Aryan Khan New Year 2024 Party Video:  Esakal
मनोरंजन

Aryan Khan: झुमे जो 'पठाण'...! शाहरुखचा लेक पुन्हा पार्टीत दिसला आता तर चक्क....

शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान देखील आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसला.

Vaishali Patil

Aryan Khan New Year 2024 Party Video: सध्या सर्वजण नववर्षाचा आनंद साजरा करत आहेत. रात्री उशिरापर्यंत सर्वांनीच नवीन वर्षांचे स्वागत केले. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करत सर्वांनी सोशल मिडियावर पोस्ट शेयर केली आहे. सर्वसामान्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील कलाकारांपर्यंत सर्वांनीच नववर्षचा दिवस खास बनवला.

अमिताभ बच्चन, अनिल कपूर, अजय देवगण, वरुण धवन, करिना कपूर, करिष्मा सर्वांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर आता अनेक कलाकारांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आता त्यातच शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान देखील आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसला.

आर्यन खान सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसतो. मात्र आता न्यू इयर पार्टीमध्ये आर्यन खानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आर्यन खान ओरीसोबत दिसत आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ न्यू इयर पार्टीचा असल्याचे बोलले जात आहे. आर्यन खानने मुंबईतील एका 5 स्टार हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली. ज्यात ओरीही दिसला.

या पार्टीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात आर्यन आणि ओरी बार काउंटरजवळ उभे राहून शॉट्स घेताना दिसत आहेत. यात वेदांत महाजन अजय देवगणची मुलगी न्यासासोबत दिसत आहे.

आर्यन खानच्या फॅन क्लबने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आर्यनची बहीण आणि शाहरुखची मुलगी सुहाना अगस्त्य नंदासोबत नववर्ष साजरा करताना दिसली.

ही पार्टी आर्यन खानच्या अल्कोहोल ब्रँडने आयोजित केल्याची चर्चा आहे. काही वेळापूर्वी त्याने त्याचा व्होडका ब्रँड लॉन्च केला. यासोबतच त्याने भारतातील एका बिअर कंपनीसोबतही भागीदारी केली होती. याशिवाय आर्यनने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड देखील सुरु केला आहे.

आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्याला अभिनेता बनायचे नाही. तो 'स्टारडम' नावाच्या एका वेब सीरिजमध्ये काम करत आहे. या वेबसिरीजचा तो दिग्दर्शक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi: अनेक हायप्रोफाईल हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचं नाव; प्रतिबंधित संघटनेशीही संबंध, पोलिस तपासात महत्त्वाची माहिती उघड

Nagpur News : फडणवीसांच्या संपत्तीत पाच वर्षांत फक्त ११ लाखांची वाढ; तर अमृता फडणवीस यांच्यावर आहे लाखोंचे कर्ज

Maharashtra Assembly Election 2024 : तिकीट वाटपाचा घोळ! पुणे शहरातील संघ भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खलबत

Manoj Jarange Patil : केवळ २४ तासांत ८०० इच्छुकांच्या मुलाखती; मनोज जरांगे यांनी जाणून घेतली मते

Nana Patole: काँग्रेससाठी उद्या निर्णायक दिवस; दिल्लीतल्या CECच्या बैठकीनंतर नाना पटोले स्पष्टच बोलले

SCROLL FOR NEXT