ashish vidyarthi, ashish vidyarthi news, ashish vidyarthi wedding,  SAKAL
मनोरंजन

Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नाने पहिल्या बायकोचं हार्टब्रेक.. इमोशनल पोस्ट शेअर करत मांडलं दुःख

आशिष विद्यार्थी यांची पहिली बायको राजोशी बरुआ उर्फ पिलू यांनी सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट केलीय.

Devendra Jadhav

Ashish Vidyarthi Wedding News: हिंदी सोबतच ११ भाषिक सिनेमात काम करणारे दिग्गज अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केलं आहे.

त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं नावं रुपाली बरुआ असं आहे. आता लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आशिष विद्यार्थींच्या दुसऱ्या लग्नामुळे पहिल्या बायकोचं मात्र हार्टब्रेक झालंय. आशिष विद्यार्थी यांची पहिली बायको राजोशी बरुआ उर्फ पिलू यांनी सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट केलीय.

(Ashish Vidyarthi got married to Rupali Barua at 60. His first wife, Rajoshi Vidyarthi, dropped cryptic posts on Instagram)

राजोशीने इंस्टाग्रामवर काही पोस्ट पोस्ट केल्या आहेत. या पोस्ट पाहून लोकांना असे वाटते की, राजोशी सध्या अशा वाईट टप्प्यातून जात आहेत. त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे.

राजोशी यांनी आशिष यांचं लग्न झाल्यावर दोन पोस्ट केल्या आहेत. राजोशी यांनी लिहिले, 'योग्य व्यक्ती तुम्हाला प्रश्न करणार नाही की तुम्ही त्याच्यासाठी किती महत्वाचे आहात. तुम्हाला ज्याचा त्रास होईल अशी कृती ते मुळीच करणार नाही हे लक्षात ठेवा."

राजोशी पुढे लिहितात.. 'आता अती विचार आणि संशय तुमच्या डोक्यातुन निघुन गेला असावा. स्पष्टतेने गोंधळाची जागा घेतली असावी. शातंता आणि संयम तुमच्या आयूष्यासा पुर्ण करेल.

तुम्ही खुप काळापासून मजबूत बनला आहे,आता वेळ आली आहे की आता तुम्हाला आशिर्वाद मिळावा कारण तुम्ही ते डिझर्व करतात.

रुपाली या आसामच्या राहणाऱ्या आहेत.रिपोर्ट्सनुसार रुपालीनं सांगितलं की काही दिवसांपूर्वीच त्यांची आणि आशिष विद्यार्थी यांची भेट झाली होती. ज्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.

२५ मे,२०२३ रोजी कोलकाता येथे आपलं कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT