comedian kunal kamra  esakal
मनोरंजन

अग्निपथ योजनेवरुन लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेनेचा गेम, कुणाल कामराचे ट्विट

काॅमेडियन कुणाल कामराचा ट्विट करुन दावा

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे राजकीय वातावरण सध्या तापले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह २० पेक्षा अधिक आमदार सुरतच्या एका हाॅटेलमध्ये थांबले आहेत. सत्ताधारी पक्षाने आरोप केला की भाजप त्यांचे सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचत आहे. सोशल मीडियावरही यावरुन चांगलेच टीका-टिप्पणी होताना दिसत आहे. चित्रपट निर्माता अशोक पंडित यांनी महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाचे निमित्त करुन संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. काॅमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) म्हणाला, अग्निवीरांपासून (अग्निपथ योजना) लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. (Ashok Pandit And Kunal Kamra Tweets On Maharashtra Politics)

वाटते की उखडून टाकणारे स्वतःच सत्तेच्या बाहेर होत आहेत, असा टोला ट्विट करुन अशोक पंडित यांना संजय राऊत यांना लगावला आहे. कुणाल कामरा म्हणाला, भारतीय सैन्याच्या मुद्द्यावरुन विचलित करण्यासाठी शिवसेनेचा उपयोग. या दोन्ही ट्विटवर युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आनंद कुलकर्णी म्हणतात, त्यांनी गेल्या निवडणुकीनंतर सत्तेत येण्यासाठी सर्व करार केले. आता कर्माचे फळ मिळत आहेत. 'उपरवाले के यहाँ देर है अंधेर नही.' घमंड तर रावणालाही होता, अशी प्रतिक्रिया व्यास यांनी दिल्ली.

मनिष शर्मा नावाचे यूजर म्हणाले, बरोबर आहे. अग्निवीर मुद्द्यावरुन विचलित करण्यासाठी भाजपच्या म्हणण्यावर काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार गायब झाले. भाजपचे इतके मानत असतील तर विरोधात मतदान केले नसते. काही जणांनी कुणालला त्याच्या जुन्या ट्विटची आठवण करुन दिली. त्यात तो म्हणाला होता, की अगोदर महाराष्ट्रात सरकार बनवा, मग मी स्वतःला तुरुंगात टाकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT