Actor Ashok Saraf esakal
मनोरंजन

Ashok Saraf : राजकारणातला सर्वात हुशार व्यक्ती कोण? अशोक सराफ यांनी दिलं उत्तर

अशोक मामांनी जेव्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या भाषणातील पहिल्याच वाक्यांनी प्रेक्षकांना, श्रोत्यांना जिंकून घेतले.

सकाळ डिजिटल टीम

Ashok Saraf marathi actor ashok parva comment : मराठी- हिंदी चित्रपट विश्वामध्ये तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणारे कलाकार म्हणून अशोक सराफ लोकप्रिय आहे. त्यांनी विनोदी अभिनयानं प्रेक्षकांनी कित्येक वर्षांपासून हसवलं. मनोरंजन केले. त्यांचा पुण्यात नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला.

मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये अशोक सराफ हे अशोक मामा म्हणून परिचित आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ७० च्या दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांना आपल्या अभिनयानं खळखळून हसवले. आजही अशोक सराफ यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. अशोक सराफ यांचा जन्मदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं अशोक पर्व नावाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Also Read - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

अशोक पर्व कार्यक्रमाला मराठी मनोरंजन विश्वातील वेगवेगळे सेलिब्रेटी उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले देखील हजर होते. मात्र यासगळ्यात प्रेक्षकांना आणि चाहत्यांना उत्सुकता होती ती अशोक सराफ हे काय बोलतात याची... याप्रसंगी अशोक सराफ यांनी आपल्या चित्रपटविषयक कारकीर्दीचा धावता आढावा घेतला.

अशोक मामांनी जेव्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या भाषणातील पहिल्याच वाक्यांनी प्रेक्षकांना, श्रोत्यांना जिंकून घेतले. अशोकजींचे ते भाषण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून ते ज्यांच्याबद्दल बोलले आहेत. त्यांनी देखील अशोक सराफ नावाचे कलाकार हे दक्षिणेत असते तर मुख्यमंत्री झाले असते असे सांगून प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती.

अशोक सराफ म्हणाले... माझ्यादृष्टीनं सगळयात मोठी गोष्ट होते आहे. ती म्हणजे हा जो सोहळा होतो आहे. जी मानपत्रं दिली जात आहेत ती राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते दिली जात आहे. त्याचा आनंद आहे. माझा अतिशय आवडता माणूस. त्याचे कारण म्हणजे, राजकारणात मी बरेच पाहिले. पण ब्रिलियंट माणूस असणे हे अभावानं आढळतं.

राज ठाकरे यांच्याकडे मी ब्रिलियंट माणूस म्हणून पाहतो. ते कोणत्याही विषयावर बोलण्यापूर्वी खूप विचार करतात. अभ्यास केल्याशिवाय ते आपले मत प्रदर्शित करत नाहीत. केवळ राजकारणच नाही इतर सामाजिक क्षेत्रातही ते अभ्यास करुन मत मांडतात. कारण अभ्यास करुन बोलणारी लोकं सापडणं अवघड आहे. अशा शब्दांत सराफ यांनी राज यांचे कौतूक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्रामधील मतमोजणीपूर्वी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात जिलेबी बनवण्याची तयारी सुरु

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT