Esha Gupta faced Racism Instagram
मनोरंजन

ईशा गुप्ताचा वर्णद्वेषा संदर्भात मोठा खुलासा; म्हणाली,' मला इंजेक्शन...'

'आश्रम ३' या वेबसिरीजमधील ईशा गुप्तानं साकारलेली बोल्ड अॅन्ड ब्युटिफुल सोनिया ही व्यक्तिरेखा सध्या भलतीच चर्चेत आहे.

प्रणाली मोरे

'आश्रम ३'(Ashram 3) वेबसिरीजमध्ये बोल्ड अंदाजात दिसलेली ईशा गुप्ता (Esha Gupta) सिरीजला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आणि तिच्या अभिनयला देखील नावाजलं जात असल्यामुळे भलतीच उत्साहात आहे. आश्रम मधील तिच्या लूक आणि बोल्डनेसची चर्चा रंगलेली असताना आता समजतंय की याच ईशा गुप्तानं वर्णभेदाचा सामना केला आहे. इतकंच नाही तर गोर बनण्यासाठी तिला इंजेक्शन घेण्याचा सल्ला देखील दिला होता. चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर(Esha Gupta faced Racism)

ईशा गुप्तानं आपलं इंडस्ट्रीतील करिअर 'जन्नत २' या सिनेमातून सुरू केलं. हा सिनेमा २०१२ मध्ये रिलीज झाला होता. ईशा गुप्तानं एक मोठा खुलासा करताना म्हटलं आहे की तिला गोरं बनवणारी इंजेक्शन घेण्याचा सल्ला देखील दिला गेला होता. तब्बल ९००० रुपयाचं एक इंजेक्शन अन् त्याचे कितीतरी सेशन अशा त्या ट्रिटमेंटची त्यानंतर आपण चौकशी देखील केल्याचं ईशा गुप्तानं म्हटलं आहे.

ईशा गुप्ता आपल्याला प्रकाश झा यांच्या 'चक्रव्यूह' सिनेमात देखील दिसली आहे. त्या व्यतिरिक्त 'राज उडी','रुस्तम' आणि 'बादशाहों' सारख्या सिनेमातही तिनं काम केलं आहे.

ईशा गुप्तानं एका मुलाखतीत म्हटलं आहे, ''माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला सर्वप्रथम माझ्या नाकाची सर्जरी करुन घेण्याचा सल्ला दिला गेला होता. मला सांगितलं गेलं की माझं नाक गोल आहे. याव्यतिरिक्त मला सल्ला दिला गेला होता की गोरं बनण्यासाठी इंजेक्शन घे. जेव्हा मी त्या इंजेक्शनची किंमत विचारली तेव्हा ते एक इंजेक्शन ९००० रुपयाला मिळतं असं मला कळलं''. ती पुढे म्हणाली,''अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी त्यांच्यावर खूप दबाव आणला जातो. मला कायम वाटतं की माझ्या मुलीनं अभिनेत्री कधीच बनू नये,नाहीतर तिच्यावर देखील सुंदर दिसण्याचं कायम प्रेशर राहिल. तिनं आपलं आयुष्य सामान्य पद्धतीनं जगावं असं मला वाटतं. मला वाटतं तिनं एथलिट बनावं. यामध्ये अभ्यासाचा ताणही मुलांवर कमी असतो''.

२०१९ मध्ये ईशा गुप्ता 'टोटल धमाल' मध्ये दिसली होती. याव्यतिरिक्त तिनं 'नकाब' सिनेमातही काम केलं आहे. तर नुकतीच तिला आपण बोल्ड-ब्युटिफुल अंदाजात 'आश्रम ३' वेबसिरीजमध्ये पाहिलं आहे. तसंच तिची 'इनव्हिजिबल वुमेन' देखील भेटीस येत आहे. आणि आता 'आश्रम'च्या ४ थ्या सिझनची तयारी देखील ती करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yeola Assembly Election 2024: येवल्यात भुजबळांविरोधात शरद पवारांचा जरांगे पॅटर्न; शिंदेंना मैदानात उतरवून मोठी खेळी

Virender Sehwag: 'संघात फक्त सेहवागचीच मनमानी होती, त्याने मला...', मॅक्सवेलने पंजाब किंग्स संघातील वातावरणाची केली पोलखोल

Latest Maharashtra News Updates : काहीही करुन आम्हाला जिंकायचे आहे- सदा सरवणकर

MNS Candidate List: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाचवी यादी जाहीर; कुणाला कुठून संधी?

Sports Bulletin 26th October: भारताचा न्यूझीलंडकडून मायदेशात १२ वर्षांनी पराभव ते एमएस धोनीकडून आयपीएल खेळण्याचे संकेत

SCROLL FOR NEXT