Asin Divorce Rumors Esakal
मनोरंजन

Asin Divorce Rumors: 7 वर्षांच्या सुखी संसारानंतर असिन घेणार घटस्फोट?

Vaishali Patil

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असिन ही लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. असिनने केवळ साउथ चित्रपचटांमध्येच नाही तर बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

तिने 2001 मल्याळम चित्रपट Narendran Makan Jayakanthan Vakaमधून तिच्या करिअरची सुरुवात केली आणि अल्पावधीतच असिन ही आघाडीची अभिनेत्री बनली.

तिने बॉलिवूडमधल्या बड्या सुपरस्टार्ससोबतही काम केल आहे ज्यात सलमान खान आणि आमिर खान अक्षय कुमार यांसारख्या कलाकारांचा सामावेश आहे.

आमिर खानच्या 'गजनी' या चित्रपटातुन लोकप्रिय झालेली असीन लग्नानंतर मनोरंजन विश्वातुन दूर गेली. तिची जास्त चर्चाही नव्हती मात्र आता पुन्हा असिन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या पतीसोबतचे सर्व फोटो डिलीट केल्याने ती तिच्या पतीपासून वेगळी होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. Ent

Asin and Rahul Sharma

असिन आणि राहुल शर्माला डेट केल्यानंतर 19 जानेवारी 2016 रोजी ते लग्न बंधनात अडकले. ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजानुसार मोठ्या धाटामाटात हा लग्न सोहळा पार पडला. राहुल शर्मा हा मायक्रोमॅक्सचा को फाउंडर आहे. मायक्रोमॅक्स ही एक भारतातील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. 2017 मध्ये असिनने मुलगी अरिनला जन्म दिला.

(Asin thottumkal divorce rumours)

तिने पतीसोबतचे सर्व फोटो इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून डिलीट केले आहेत. त्‍यानंतर चाहत्‍यांना धक्का बसला आहे. असिन पती राहुलपासून घटस्फोट घेणार आहेत की काय अशी चर्चा सुरु आहे.

असीनच्या अकाउंटाला आता तिच्या पतीसोबत फक्त एकच फोटो आहे जो दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्या निधनानंतर असिनने शेयर केला होता. हा मोनोक्रोम फोटो आहे. manorajan

त्यातच आता असिन आणि राहुलच्या एका सोशल मिडियावरील एका फॅन पेजने असा दावा केला आहे की, असिनने फेब्रुवारीमध्येच तिचे राहुलसोबतचे फोटो डिलिट केले होते. पेजच्या अॅडमिनने या जोडप्याचे काही फोटो शेअर केले आहे.

असिन आणि तिचा पती राहुल यांच्यात काही वाद आहे की सर्व ठिक आहे याबाबत अभिनेत्रीने काही अधिकृत पुष्टी केलेली नाही. असीनने राहुलसोबतचे तिचे सर्व फोटो का डिलीट केले याबाबत तिने काही सांगितले नाही. त्यामुळे आता तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT