Swara Bhasker On Atiq Ahmed Murder: प्रयागराज येथे वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोन ते तीन हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार केला.
गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी आत्मसमर्पण केले. अतिक आणि अशरफ हे उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी होते. याच्या हत्येनंतर देशात एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली आहे. राजकीय स्तरावरुन या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. आता त्यातच मनोरंजन विश्वातुनही या हत्येवर प्रतिक्रिया आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.
स्वरा ही अनेक मुद्दयावर भाष्य करत असते. अतिक अहमद आणि अशरफ हत्या प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विट करताना त्यांनी या विषयावर आपले म्हणणे मांडले आहे.
'अतिरिक्त न्यायालयीन हत्या किंवा एन्काउंटर ही बाब साजरा करण्यासारखी गोष्ट नाही. हे अराजकतेची स्थिती दर्शवत आहे. राज्य संस्थांची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे हे यावरुन सुचित होत आहे. कारण ते गुन्हेगारांसारखे वागत आहेत किंवा त्यांना सक्षम करीत आहेत हे यातून दिसत आहे. हे कठोर शासन नव्हे नाही तर ही अराजकता आहे.'
स्वराचं हे ट्वटि काही तासातच व्हायरल झाले आहे. तिचे हे ट्वीट खूप चर्चेतही आहे. तिच्या या ट्विटवर नेटकरी यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
त्यातच स्वराचा नवरा आणि समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यानंही ट्विट केलं आहे. असद अहमद एन्काउंटर प्रकरणावर आपले म्हणणे मांडताना फहाद म्हणाला होता की, अनेकांना असं वाटतं की असद अहमद हा मुस्लिम आहे म्हणून याला विरोध करत आहे, पण हा गैरसमज आहे. आम्ही विकास दुबेची हत्याही साजरी केली नाही आणि इतर कोणाचाही उत्सव साजरा करणार नाही. समस्या तुमच्यासोबत आहे. तुमचा संविधान आणि संस्थांवर विश्वास नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.