avatar 2 shot underwater in a budget of 1900 crores avatar worlds most expensive franchise will cost rs 11200 crore  
मनोरंजन

Avatar 2 : जगातला सर्वात महागडा चित्रपट! अंडरवॉटर शूटसाठी झाला 'इतका' खर्च

सकाळ डिजिटल टीम

तब्बल एका दशकानंतर जेम्स कॅमेरून दिग्दर्शित अवतार चित्रपटाचा दुसरा भाग 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाता दुसरा भाग पूर्णपणे पाण्याखाली शूट करण्यात आला असून अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि अॅक्शनने परिपूर्ण अवतार-2, 250 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1900 कोटी रुपयांच्या अवाढव्य बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. याच प्रचंड बजेटमुळे ही सीरीज आतापर्यंतची सर्वात महागडी फ्रेंचाइजी बनली आहे.

7 वर्षांनी रिलीज रखडलं..

2009 मध्ये अवतार रिलीज होण्याआधीच, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने जाहीर केले होते की पहिला चित्रपट यशस्वी झाल्यास त्याचा सिक्वेल बनवू. त्यानंतर अवतारच्या रेकॉर्डब्रेक कमाईनंतर 2010 मध्ये दोन सिक्वेलची घोषणा करण्यात आली होती. अवतार -2 चित्रपट हा 2014 मध्ये रिलीज होणार होता, परंतु त्याच्या प्री-प्रॉडक्शनमुळे तो 7 वर्षांनी 2022 मध्ये रिलीज होणार आहे.

चित्रपटाचा सिक्वेल कधी रिलीज होणार?

अवतार-2 ची रिलीड डेट सलग 8 वेळा पुढे ढकलल्यानंतर 16 डिसेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय अवतार-3 हा 20 डिसेंबर 2024 रोजी, अवतार-4 हा 18 डिसेंबर 2026 रोजी आणि अवतार-5 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी त्यांची शीर्षकेही बदलण्यात येणार आहेत.

अवतारने मोडले होते कमाईचे सर्व रेकॉर्ड

अवतारचा पहिल्या पार्टने जगभर कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. 237 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1800 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या अवतारचे जगभरात 20 हजार 368 कोटींचे कलेक्शन केले होते. या चित्रपटापूर्वी 20 हजार 332 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या एव्हेंजर्स एंडगेमच्या नावावर हा विक्रम होता. आता $250 दशलक्ष (रु. 1900 कोटी) च्या बजेटसह अवतार 2 हा विक्रम मोडेल अशी अपेक्षा आहे.

प्रत्येक पार्टसाठी 1900 कोटी खर्च

अवतारचे आगामी 4 सिक्वेल येत आहेत, ज्यासाठी प्रत्येक भागासाठी $250 दशलक्ष (1900 कोटी) बजेट ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे, चित्रपटाच्या 5 सिक्वेलसह या फ्रेंचायझीचे एकूण बजेट 1237 दशलक्ष डॉलर्स (11,300 कोटी) इतके आहे. ही जगातील सर्वात मोठी बजेट फ्रँचायझी बनली आहे.

पाण्याखाली शूट का केलं?

एका मुलाखतीदरम्यान जेम्सने या चित्रपट बनवणं म्हणजे वेडेपणा असल्याचे म्हटले आहे. अवतारच्या पहिल्या भागाने एवढी चांगली कमाई केली नसती, तर त्याने असा चित्रपट कधीच बनवला नसता, असे त्यांनी स्पष्ट केलं. चित्रपटाची प्रॉडक्शन टीम पाण्याखाली शूटिंग करण्याच्या विरोधात होती. लोकांनी जेम्सला सर्व सीन बाहेरील तारांद्वारे शूट करून पाण्याखाली अॅनिमेट करण्याची सूचना केली होती. अशाप्रकारे एक चाचणी देखील घेण्यात आली परंतु जेम्सचे समाधान झाले नाही आणि त्याने सर्व दृश्य पाण्याखाली शूट करण्याचा निर्णय घेतला.

अवतार 2 साठी मुख्य छायाचित्रण 15 ऑगस्ट 2017 रोजी मॅनहॅटन बीच, कॅलिफोर्निया येथे सुरू झाले. तर तिसरा भाग न्यूझीलंडमध्ये शूट करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षांत त्याचा दुसरा भाग पूर्ण झाला असून तिसऱ्या भागाचे चित्रीकरण जवळपास पूर्ण झाले आहे.

चित्रपटाची स्टारकास्ट काय आहे

अवतार 2 मध्ये पहिल्या भागाप्रमाणेच केट विन्सलेट, सॅम वर्थिंग्टन, जोई साल्दाना, स्टीफन लाँग, विन डिझेल, एडी फाल्को, क्लिफ कर्टिस हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT