नवी दिल्ली : कंगना राणौत हीनं अयोध्येतील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावर माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. यावेळी अयोध्या धामचं महत्व सांगताना आपल्यासाठी हे ठिकाण म्हणजे व्हिटिकन सिटी असल्याचं तिनं म्हटलं आहे. अयोध्येच्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना तीनं हे विधान केलं. (ayodhya dham is our vatican city kangana ranaut imp appealed to people)
अयोध्या धाम म्हणजे व्हॅटिकन सिटी - कंगना
कंगना म्हणाली, "अयोध्या धामचे जे दर्शक असतील ते अत्यंत पुण्य कमावणार आहेत. अयोध्या धाम हे आपलं सर्वात मोठं धाम आहे. जसं की जगात व्हॅटिकन सिटीचं जे महत्व आहे, ते अयोध्या धामचं आपल्यासाठी आहे" (Latest Marathi News)
न येणाऱ्यांना रामानं दुर्बुद्धी दिलीए
जे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार नाहीत त्यांच्याबाबत मी काय सांगू. कारण ज्या प्रकारे ईश्वरानं श्रीरामानं आपल्याला सद्बुद्धी दिली आहे की, आपण त्यांच्याकडं यावं आणि त्याचं दर्शन घ्यावं. तसंच त्यांना दुर्बुद्धी दिलीए की ते त्यांच्या दरबारात येऊ नयेत, त्यांचं दर्शन त्यांनी घेऊ नये, असंही यावेळी कंगनानं म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
बाबरीबाबत जे झालं ते झालं
बाबरी मशिदीत नमाज पठण केलं जात होतं, पण बहुसंख्याकांची मर्जी राखण्यासाठी राम मंदिराचा निर्णय आला असं एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. या प्रश्नावर बोलताना कंगनानं म्हटलं की, "आता जे झालं ते झालं. जे सनातन आहे ते सत्य आहे. हजारो वर्षांपूर्वी इथं रामराज्य होतं पण रामाचं चरित्र आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात जीवंत आहे. तसेच त्यांची २२ तारखेला प्राणप्रतिष्ठा होत आहे.
त्यामुळं स्वतः श्रीराम आपलं दर्शन देतील, राम मंदिरात ते विराजमान होतील. त्यामुळं रामराज्याचं पुनर्निर्माण होईल. पण जे येणार नाहीत त्यांनाही राम सुबुद्धी देईल आणि ते इथं येतील. जय श्रीराम"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.