Mahabharat artists fee Esakal
मनोरंजन

Mahabharat: कौरव की पांडव..बी आर चोप्रांच्या महाभारतात कोणाला मिळालेलं सर्वाधिक मानधन..

'महाभारत' या मालिकेला ३३ वर्ष झाल्यानंतर आता सोशल मीडियावर त्यातील कलाकारांच्या मानधनाला घेऊन चर्चा सुरू झालेली दिसत आहे.

प्रणाली मोरे

B R Chopra यांच्या महाभारताला कोण बरं विसरू शकतं.. याची चर्चा करणं देखील कोणी सोडू शकत नाही. 'महाभारत' मालिकेचं प्रसारण १९८८ मध्ये झालं होतं. पण ३३ वर्षांनतर देखील या मालिकेविषयी एक नवा विषय चर्चेत आला आहे.

माहितीसाठी सांगतो की,करोडोंच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'महाभारत' मालिकेत जवळपास शंभर एक कलाकारांनी तरी काम केलं होतं. आता लोकांना हा प्रश्न पडलाय की बी आर चोप्रा यांनी नक्की कोणाला किती मानधन त्यावेळी दिलं होतं...चला जाणून घेऊया. (B R Chopra mahabharat kauravas pandavas draupadi actors per episode fees)

मिळालेल्या माहितीनुसार कळतंय की बी आर चोप्रा आपल्या कोणत्याच कलाकारासोबत भेदभाव करायचे नाहीत. कोणत्याही कलाकाराच्या मनात कसलाही गर्व निर्माण होऊ नये म्हणून बी आर चोप्रा त्यावेळी महाभारतातील सर्व कलाकारांना एकसमान मानधन द्यायचे.

टेली चक्करच्या रिपोर्टनुसार, महाभारतातील सगळ्याच कलाकरांना प्रत्येक एपिसोडगणिक ३ हजार रुपये मिळत होते. महाभारताचे एकूण ९४ भाग प्रसारित झाले होते. याचाच अर्थ बी आर चोप्रा यांनी प्रत्येक कलाकाराला २,८२,००० रुपये दिले होते.

म्हटलं तर असं देखील जातं की काही लोकांनी बी आर चोप्रा यांच्यासाठी फ्री मध्ये काम केलं होतं. युद्धाच्या सीनसाठी ज्या-ज्या एक्स्ट्रा लोकांना कास्ट केलं होतं त्यांनी बी आर चोप्रा यांच्याकडून एकही पैसा घेतला नव्हता. जेव्हा युद्धाचे सीन शूट व्हायचे तेव्हा शूटिंग पहायला स्थानिक लोक मोठ्या संख्येने गर्दी करायचे. त्याच गर्दीतून कितीतरी लोक 'महाभारत' मालिकेसाठी कोणतंही मानधन न घेता काम करायचे.

एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत महाभारताचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांची पत्नी रेणूनं सांगितलं होतं की,''महाभारतच्या एका एपिसोडसाठीचं एकूण बजेट ६ लाख रुपये होतं. कधी-कधी ६ लाख देखील कमी पडायचे. यामुळे अनेकदा रवी कपूर टेन्शनमध्ये यायचे,पण बी आर चोप्रा नेहमी त्यांना दिलासा द्यायचे की बजेटची चिंता करू नकोस''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT