randhir kapoor and babita  Sakal
मनोरंजन

Randhir Kapoor Birthday: रणधीर यांच्यामुळे बबिता यांनी करिना- करिश्माला घेऊन सोडलेलं घर, काय होतं नेमकं कारण

रणधीर कपूर हे त्यांच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिले.

सकाळ डिजिटल टीम

रणधीर कपूर हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेते होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. रणधीर कपूर यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. रणधीर आणि बबिता यांनी 1971 मध्ये एकमेकांना जीवनसाथी बनवले.

दोघांची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे. रणधीर कपूर आणि बबिता यांची पहिली भेट १९६९ मध्ये आलेल्या 'संगम' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांची एकमेकांची ओळख झाली आणि नंतर हळूहळू भेटण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, रणधीर कपूर यांचे वडील राज कपूर यांना याबाबतचा सुगावा लागला.

जेव्हा राज कपूर यांना त्यांच्या अफेअरबद्दल कळले तेव्हा त्यांनी रणधीरला सांगितले की, "लग्न करण्याचा विचार आहे की नाही, ती म्हतारी झाल्यावर लग्न करणार का". कपिल शर्माच्या शोमध्ये रणधीर कपूर यांनी याचा खुलासा केला होता.

यादरम्यान त्यांनी हेही सांगितले होते की, दोघांचाही लग्नाचा कोणताही प्लॅन नव्हता कारण ते टाइमपास रिलेशनशिपमध्ये होते, पण घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांनी लग्न केले. ६ नोव्हेंबर १९७१ रोजी रणधीर आणि बबिता विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर हे जोडपे करिश्मा आणि करीना या दोन लाडक्या मुलींचे पालक झाले. त्याचवेळी बबितानेही चित्रपटात काम करणे बंद केले होते.

randhir kapoor and babita

80 च्या दशकात रणधीर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करत नव्हते. त्यांचा कारकिर्दीचा आलेख सतत खाली घसरत होता. यामुळे ते खूप अस्वस्थ होऊ लागले आणि त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली.

दारू पिण्याच्या सवयीमुळे बबितालाही त्रास होऊ लागला. यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि बबिता करिश्मा आणि करिनासोबत वेगळे राहू लागली. त्यांनी रणधीर कपूर यांचे घर सोडले होते .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT