bageshwar dham dhirendra shastri angry reaction on adipurush om raut prabhas kriti sanon saif ali khan  
मनोरंजन

Bageshwar Baba on Adipurush: अशी फिल्म बनवणाऱ्याला.. बागेश्वर बाबा आदिपुरुषवर भडकले

आदिपुरुषवर बागेश्वर बाबाने त्याची प्रतिक्रिया दिलीय जी आता कमालीची व्हायरल झालीय

Devendra Jadhav

Bageshwar Baba on Adipurush News: आदिपुरुष सिनेमा टीकेचा धनी बनला आहे. आदिपुरुष चौफेर टीका झालीय. आदिपुरुष रिलीज होऊन एक आठवड्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे.

पण सिनेमावर टीका होणं काही कमी होत नाहीये. अशातच बागेश्वर बाबाने आदिपुरुषवर नाराजी व्यक्त केलीय. आदिपुरुषवर बागेश्वर बाबाने त्याची प्रतिक्रिया दिलीय जी आता कमालीची व्हायरल झालीय.

(bageshwar dham dhirendra shastri angry reaction on adipurush om raut prabhas kriti sanon saif ali khan)

कॉपी करणे ही चांगली गोष्ट आहे मात्र अशी कॉपी करू नये असं बाबा म्हणाले. बाबा पुढे म्हणतात, आजकाल असा चित्रपट आला आहे, ज्यामध्ये हनुमानजींना असं दाखवलं गेलं आहे कि फक्त वीर बजरंगबलीच त्यांना वाचवू शकतात.

धिरेंद्र शास्त्री म्हणाले की, आम्ही संपूर्ण चित्रपट पाहिला नाही, पण त्यात किती खालच्या पातळीचे संवाद बोलले गेले आहेत हे मला कोणीतरी सांगितले. तेल तेरे बाप का... असे ज्यांनी लिहिले आहे ते आयुष्यात कुठेतरी अडकले तर फक्त जय-जय सीतारामच म्हणतील.

बजरंगबली बोलण्यात थोडे कडू आहेत पण...

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, हनुमानजी बोलण्यात थोडे कडू आहेत पण तेवढे नाहीत. तो अतिशय ज्ञानी, हुशार आणि सौम्य आहेत. त्यांना तर्काच्या दृष्टीने विचार करतो. परंतु लोकांनी त्यांच्या बचावात असे युक्तिवाद करू नये, ज्यामुळे तर्क बिघडतील.

ते म्हणाले की, चित्रपट मनावर छाप सोडतो. त्यामुळे आपली मूल्ये वाढीस लागतील आणि सनातन धर्माचे जतन होईल, असा चित्रपट बनवला पाहिजे. मी एवढेच म्हणेन की असे चित्रपट बनवणाऱ्यांना हनुमानजी सुबुद्धी द्यावी.

आदिपुरुष बद्दल कोर्टाचा आदेश

आदिपुरुष सिनेमाबद्दल कोर्टानं आदेश दिलाय कि, फक्त रामायणच नाही तर पवित्र ग्रंथ कुराण, गुरु ग्रंथ साहिब आणि गीता सारख्या धार्मिक ग्रंथांना तरी निर्मात्यांनी सोडले पाहिजे.

त्या ग्रंथांना चित्रपट निर्मिती सारख्या प्रक्रियेचा भाग बनवता कामा नये. सेन्सॉर बोर्डाला देखील कोर्टानं काही गोष्टींची विचारणा केली असून त्यांच्याकडून लेखी उत्तरं मागवली आहेत.

मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आलेला नाही. याबाबत कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT