baipan bhaari deva latest record break box office report directed by kedar shinde SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: बाईपण भारीच..! केदार शिंदेंच्या सिनेमाने आठवड्यातच कमावला इतका विक्रमी गल्ला

बाईपण भारी देवा रिलीज होऊन आज आठवडा पूर्ण झाला. आठवड्याभरात या सिनेमाने विक्रमी गल्ला जमवलाय

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva Box Office Report News: बाईपण भारी देवा हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा सिनेमाने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवलाय.

या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर पकड मिळवण्यास यश मिळवलंय. बाईपण भारी देवा रिलीज होऊन आज आठवडा पूर्ण झाला.

आठवड्याभरात या सिनेमाने विक्रमी गल्ला जमवलाय. सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी यांनी बॉक्स ऑफीस रिपोर्ट शेयर केलाय.

(baipan bhaari deva latest record break box office report directed by kedar shinde)

केदार शिंदेंनी बाईपण भारी देवा सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट शेयर केलाय. रिपोर्टनुसार बाईपण भारी देवा सिनेमाने केवळ आठवड्याभरातच साडेबारा कोटींचा (12.50 CR) गल्ला जमवलाय.

बाईपण भारी देवा सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी सिनेमांची चलती आहे. असं म्हणता येईल. या वर्षी केदार शिंदेंचे महाराष्ट्र शाहीर आणि आता रिलीज झालेला बाईपण भारी देवा हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

या यशाबद्दल बाईपण भारी देवाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी भावना व्यक्त केल्या आहेत. केदार लिहीतात.. माझ्या आयुष्यात आलेल्या असंख्य स्त्रियांच्या आशिर्वादाने हे यश मिळालंय. मला जन्म देणारी आई... सांभाळणारी आजी.. लक्ष ठेवणाऱ्या मावश्या...

मला लग्नानंतर सांभाळून घेणारी माझी बायको.. आनंद देणारी माझी मुलगी.. माझ्या प्रत्येक कामात सहभागी असणारी माझी सहकारी, अभिनेत्री आणि माझ्या कामावर प्रेम करणारी स्त्री प्रेक्षक.. हे तुमचं यश आहे.

या सिनेमातली प्रत्येक स्त्री जी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तीचं हे यश आहे. मी फक्त निमित्त मात्र!! ही स्वामीआई ची कृपा हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद...

जिओ स्टुडियोजचा 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी देखील जगायला शिकवणार हे नक्की.. तेव्हा आता तयार रहा.. केदार शिंदेंचा स्पेशल टच असलेला, सहा गुणी अभिनेत्रींनी चित्रपटात उडवलेली धमाल, अनुभवायला!

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT