baipan bhaari deva will break box office report of sairat nagraj manjule kedar shinde  SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: बाईपण भारी देवा सैराटचा विक्रम मोडणार? कमाईचा आकडा पाहून थक्क व्हाल

Devendra Jadhav

Baipan Bhaari Deva Latest Box Office Report: बाईपण भारी देवा सध्या चांगलाच चर्चेत आहे. भर पावसात बाहेर पाण्याने रस्ते तुडूंब भरलेत तर आत बाईपण भारी देवा पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल्ल झाले आहेत.

बाईपण भारी देवा पाहायला प्रेक्षकांनी गर्दी केलीय त्यामुळे बाईपण भारी देवा चा कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढत जातोय. आता बाईपण भारी देवा सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट पाहून सिनेमा सैराटचा विक्रम मोडणार का? असा प्रश्न सर्वांना पडलाय

(baipan bhaari deva will break box office report of sairat nagraj manjule kedar shinde)

बॉक्स ऑफीस सुसाट, केदार शिंदेंनी मानले आभार

बाईपण भारी देवा लेटेस्ट बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय. हा रिपोर्ट पाहून बाईपण भारी देवा सैराटचा विक्रम मोडणार अशी चिन्हं दिसत आहेत. बाईपण भारी देवा सिनेमाने आतापर्यंत ६५.६१ कोटींची कमाई केलीय.

या कमाईबद्दल बाईपण भारी देवाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी भावना व्यक्त केल्या. केदार शिंदे म्हणतात.. ही तर श्री स्वामींची कृपा.. हा श्री सिद्धिविनायकाचा महाप्रसाद.. मराठी सिनेमाच्या इतिहासात याची नोंद घेतली जाईल. स्त्री घर चालवते तर, सिनेमा तर निश्चितच चालवू शकते. सैराट नंतरचा बाईपण ठरला महाराष्ट्राचा महासिनेमा..

बाईपण भारी देवा सैराटचा विक्रम मोडणार

'बाईपण भारी देवा' या चित्रपटाला फुल टू माउथ पब्लिसीटी मिळत आहे. त्यातच चित्रपटाची कथा, त्याला घातलेली भावनिक साद आणि चित्रपटातील कमाल गाणी यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. याचाच फायदा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवर महिलांची गाडी सुसाट निघाली आहे. या गाडीने 65 कोटींचा स्टेशन गाठलं आहे. आता ही गाडी 100 कोटींच्या स्टेशनकडे वळाली आहे.

प्रेक्षकांच्या प्रेमाचा हा स्पिड असाच कायम असला तर बाईपण भारी देवा ची गाडी लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करेल आणि सैराटचा विक्रम मोडेल अशी शंका नाकारता येत नाही.

बाईपण भारी देवा महाराष्ट्राचा महासिनेमा

३० जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'बाईपण भारी देवा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या या चित्रपटात सहा अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाने लाखो मने जिंकली. त्यांच्या अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

फक्त 5 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट अनेक रेकॉर्ड करत आहे. आतापर्यंत चित्रपटाने पन्नास कोटींचा आकडा पार केला. अशाप्रकारे तो २०२३ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT