मनोरंजन

Baipan Bhari Deva: "एव्हढा काय चांगला पिच्चर नाही..", चित्रपट समीक्षकाची 'बाईपण भारी देवा' सिनेमासाठीची पोस्ट चर्चेत

Vaishali Patil

Baipan Bhari Deva  मराठी मनोरंजन विश्वात सध्या बाईपण भारी देवा या चित्रपटाची भलतिच चर्चा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या खुपच पसंतीस पडला. चित्रपटाला रिलिज होऊन तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत तरी देखील चित्रपटगृहातील महिलांची गर्दी काही केल्या कमी होतांना दिसत नाही आहे.

केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात सहा बहिणींची गोष्ट दाखवण्यात आली आहे. जी महिला वर्गाच्या मनाला भिडली. त्यामुळेच या चित्रपटाला महिला वर्गांची जास्तच गर्दी दिसली. आता प्रेक्षकांबरोबरच अनेक कलाकार आणि दिग्दर्शकही या चित्रपटाच्या यशाबद्दल पोस्ट करत आहेत. त्यातच आता पत्रकार आणि चित्रपट समीक्षक नरेंद्र बंडबे यांनी देखील एक लांबलचक पोस्ट शेयर केली आहे. नरेंद्र बंडबे जागतिक सिनेमांवर मराठीतून लिहिणारे पत्रकार आहेत. त्याच्या पोस्ट या नेहमीच चर्चेत असतात.

'बाईपण भारी देवा' चित्रपटाबाबत पोस्ट शेयर करतांना त्यांनी झिम्मा आणि बाईपण भारी देवा या दोन्ही सिनेमांचे पोस्टर शेयर केले आहेत.

त्यासोबतच ते लिहितात की, "एव्हढा काय चांगला पिच्चर नाही. 'चार दिवस सासू'ची सासू (रोहिणी हट्टंगडी) आणि 'तू चाल पुढे'मधली अश्विनी (दीपा परब)आहे त्यात. बाकीपण सिरीयलमधल्या बायका आहेत. म्हणून बघायला मज्जा आली." ८२ वर्षांच्या आईची 'बाईपण भारी देवा' (२०२३)बद्दलची ही प्रतिक्रिया. अलिकडे वेड(२०२२) नंतर हा दुसरा मराठी सिनेमा आहे, जो हाऊसफुल्ल चालतोय. इंडस्ट्रीसाठी हे खरंच चांगलं आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे आणि झी सिनेमासाठी तर दिलासा आहे. आधीचा 'महाराष्ट्र शाहीर' (२०२३) सर्वप्रकारचे प्रयत्न करूनही प्रेक्षकांना खेचण्यात यशस्वी ठरला नाही. बाईपण भारी चालतोय. त्यातली मंगळागौरीची गोष्ट प्रेक्षकांना खासकरुन महिलांना थिएटरपर्यंत खेचून आणतेय.'

'झिम्मा (२०२१)ही असाच चालला. बऱ्यापैकी गल्ला जमवला. हे यशाचं सुत्र मानलं तर महिलांसंदर्भातल्या सिनेमांना गर्दी होतेय असं समजून 'माहेरची साडी सिंड्रोम' वाढू शकतो. तो टाळता आलं म्हणजे मिळवलं. '

महिलाकेद्रिंत चित्रपटाबद्दल बोलतांना त्यांनी लिहिलं की, एकमात्र खरं की टेलिव्हिजन सिरीयल्समधल्या दिसणाऱ्या महिला कॅरेक्टर्सनी मोठी स्क्रिनही काबिज करायला सुरुवात केलीय. टिव्हीतले कलाकार, टिपिकल मंगळागौर, महिलांची सोलो किंवा ग्रुप पिकनिक किंवा साउथ सिनेमांचे रिमेक सारखे स्टिरिओटाईप विषय मराठीत चालत असतील तर आशयघन सिनेमा म्हणून प्रसिद्ध असलेल्‍या मराठीतील काही दिग्दर्शकांनी थोडी विश्रांती घ्यावी. एव्हढंच.

एक गोष्ट जाणवली ती अशी की बाईपण भारीला जाणाऱ्या प्रेक्षकांमध्ये पीयर प्रेशर आहे. थेटरात गेल्यावर तो प्रकर्षाने जाणवतो.

झिम्मा आणि बाईपण मध्ये समान दुवा आहे. परिस्थितीत अडकलेली ती, तिच्या अनेक इच्छा आकांक्षांचं झालेलं दमन, आणि जिले जरा... किंवा थोडीसी जिंदगी टाईप आशावाद. हे असं का आवडतंय याचाही विचार व्हायला हवा. '

थोडक्यात त्यांनी या पोस्टच्या माध्यमातुन प्रेक्षकांचा मराठी चित्रपटांकडे झुकता कल दाखवला. मराठी सिनेमे आता प्रेक्षकांच्या पसंती उतरतायं. यंदा अनेक मराठी चित्रपचटांची बॉक्स ऑफिसवर चलती दिसली आहे.

त्यात रितेश देशमुख चा 'वेड' असो किंवा 'महाराष्ट्र शाहिर'. आता त्यात बाईपण भारी देवा ची भर पडली .आणखी बरेच सिनेमे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे त्यांना देखील प्रेक्षकांचे असेच प्रेम मिळते की नाही हे पहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT