Balbharti Marathi Movie News:  esakal
मनोरंजन

Balbharti: सिद्धार्थ जाधव म्हणतोय, घरातल्या प्रत्येकासाठी ‘बालभारती'

पालकांना त्यांच्या मुलांसाठी सर्वात जास्त काय हवे आहे. तर उत्तम शिक्षण.हीच कळकळ या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Balbharti Marathi Movie News: बालभारती म्हणजे गमतीशीर कथा आणि मनाला भिडणारा संदेश यांची गुंफण. हा चित्रपट महाराष्ट्रीय संस्कृती आणि मराठी भाषेत रुजलेला आहे. तो मराठी भाषा, सर्जनशीलता आणि शोध यांना एकत्र आणतो तोही अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने. योगायोगाने हा चित्रपट आजच्या ‘जय संशोधन’ या घोषणेशी सुसंगत आहे. जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय संशोधन ही नवीन घोषणा आहे.

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट बालभारतीचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. स्फियरओरिजीन्स यांनी निर्मिती आणि नितीन नंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पोस्टरची पहिली झलकच चित्रपटाचे वेगळेपण दाखवतो. बालभारती हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. पालकांना त्यांच्या मुलांसाठी सर्वात जास्त काय हवे आहे. तर उत्तम शिक्षण.हीच कळकळ या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे.

या पोस्टरमध्ये चित्रपटाचा खरा नायक आर्यन मेंघजी हा बालकलाकार आहे. त्याच्यासोबत मराठीतील आघाडीचे सिध्दार्थ जाधव, अभिजित खांडकेकर आणि नंदिता पाटकर हे कलाकार आहेत. आर्यन एक महान शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या पोशाखात दिसतोय. आर्यनच्या वडिलांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थच्या हातात इंग्रजीतून मराठी शब्दकोश आहे, तर नंदिताने हेल्मेट घातले आहे ज्यावर टॉक इन इंग्लिश असे शब्द लिहिलेले आहेत. यावरून नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटाच्या विषयाचा अंदाज येईल. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या विषयाची चर्चा आहे.

कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय,मधुर संगीत आणि हृदयस्पर्शी कथा यांचा एक अनोखा मिलाफ असलेला बालभारती प्रत्येक महाराष्ट्रीयन घरातील मनाला नक्कीच स्पर्श करेल. निर्माते कोमल आणि संजय वाधवा म्हणाले, “ आम्ही हा चित्रपट खूप श्रद्धेने आणि उत्कटतेने बनवला आहे. आम्हाला आशा आहे की सर्वांनाही तो आवडेल”.

दिग्दर्शक नितीन नंदन यांनी सांगितले की, “संपूर्ण कलाकार आणि तंत्रज्ञांनी या चित्रपटावर मेहनतीनं काम केलं आहे. प्रेक्षकांनाही हा सिनेमा आपलासा वाटेल. प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांसाठी हा चित्रपट आहे.” लवकरच बालभारतीचा ट्रेलरही आम्ही घेऊन येणार आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Property Rights: खाजगी मालमत्ताधारकांच्या हक्कांना मिळाला मजबूत आधार ; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

Arjun Tendulkar : अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार? मुंबई इंडियन्सच नव्हे, तर चार तगडे संघ बोली लावणार

Nashik Vidhan Sabha Election: विधानसभेत महायुतीला 175 जागा मिळणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहिती

Diwali Weekend Hotel Spike : शहर निघाले हॉटेलिंगला..! चार दिवसांत ३ ते ४ कोटींची उलाढाल, सुट्यांमध्ये गाठणार ९ कोटींचा टप्पा

Heena Gavit : भाजपला विधानसभेच्या तोंडावर मोठा झटका! माजी खासदाराचा पक्षाला रामराम; विधानसभेच्या मैदानात अपक्ष लढणार

SCROLL FOR NEXT