Baloch Movie Review: गेल्या अनेक दिवसांपासुन सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' सिनेमाची अनेकांना उत्सुकता लागली होती.
पोस्टरमधील प्रवीण तरडे यांचे रौद्र रूप विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या नजरेतून क्रोध व्यक्त होत आहे. कसा आहे 'बलोच' जाणुन घ्या
(baloch marathi movie review starring pravin tarde, smita gondkar)
काय आहे सिनेमाची कथा?
बलोच पानिपतच्या शूर मराठा युद्धाचे चित्रण करतात. पानिपतच्या पराभवानंतर त्यांना बलुचिस्तानमध्ये गुलाम म्हणून मराठ्यांना काम करण्यास भाग पाडले गेले.
पानीपतच्या युद्धानंतर घडलेल्या काही घटनांचे साक्षीदार आपल्याला बलोच सिनेमात पाहायला मिळतात.
एकुणच कितीही अन्याय सहन केला तरी मराठे झुकले नाहीत. त्यांनी त्यांच्या अस्तित्वाची लढाई केली.
चांगल्या प्रकारे बनवलेल्या ऐतिहासिक चित्रपटांबद्दल असे काहीतरी आहे जे आपल्याला सर्व प्रकारच्या भावना अनुभवायला लावते.. बलोच हा नक्कीच असा चित्रपट आहे.
दिग्दर्शक प्रकाश जनार्दन पवार यांनी पात्रांची मांडणी आणि दमदार कथानक रचल्यामुळे सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
कसा आहे कलाकारांचा अभिनय?
प्रवीण तरडे मुख्य भुमिकेत म्हणून एकदम परफेक्ट आहेत. प्रवीण हे या चित्रपटाचा आत्मा आहे आणि त्यांनी बलोच मध्ये त्यांची भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे.
प्रवीण यांची देहबोली, त्यांची संवादफेक सिनेमाच्या कथेला एकदम साजेशी आहे.
अशोक समर्थ नेहमीप्रमाणेच खलनायकी भुमिकेत अप्रतिम आहेत. अशोक समर्थ यांना पडद्यावर पाहणं एक मेजवानी आहे.
स्मिता गोंदकर आणि अमोल कागणे यांनीही उत्तम अभिनय केला आहे. नरेंद्र भिडे आणि मोहीत कुलकर्णी यांनी दिलेलं संगीत श्रवणीय आहे.
प्रवीण तरडे यांचा २०२२ मध्ये आलेला धर्मवीर सिनेमा प्रचंड गाजला. प्रवीण तरडे शेवटी सरसेनापती हंबीरराव या सिनेमात हंबीरमामांच्या भूमिकेत दिसले.
याशिवाय वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांच्या रांगड्या ऐतिहासिक भूमिकेत झळकणार आहेत. बलोच च्या माध्यमातून प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट काम केलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.