Barbie Vs Oppenheimer esakal
मनोरंजन

Barbie Vs Oppenheimer : बार्बीनं 'ओपनहायमर'ला रडवलं! बॉक्स ऑफिसवर तर....

युगंधर ताजणे

Barbie' BEATS 'Oppenheimer' at global box office : हॉलीवूडच्या दोन चित्रपटांनी सध्या जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यात ख्रिस्तोफर नोलानचा ओपनहायमर आणि ग्रेटा ग्रेविगचा बार्बी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर या दोन्ही चित्रपटांची तुफान चर्चा होत आहे. मात्र यासगळ्यात अनेकांना उत्सुकता आहे की, त्यामध्ये बाजी कोण मारतयं?

जगाला अणूबॉम्ब आणि त्याची ताकद काय असते हे दाखवून देणाऱ्या जे रॉबर्ट ओपनहायमर यांच्या आयुष्यावर आधारित ओपनहायमर नावाच्या चित्रपटाचं प्रेक्षकांनी स्वागत केले आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही प्रचंड असल्याचे दिसून आले आहे. नोलान हे नेहमीच त्यांच्या आगळ्या वेगळ्या कलाकृतीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या चित्रपटांना मिळालेला प्रतिसाद कमालीचा होता. त्यात टेनेट, डंकर्क आणि इंटरस्टेलर या चित्रपटांची नावं सांगता येतील.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

२१ जुलै रोजी बार्बीनं देखील थिएटरमध्ये धडक घेतली आहे. या चित्रपटाचं प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. खरं तर ओपनहायमर आणि बार्बी या दोन्ही चित्रपटांचे प्रेक्षक वेगळे आहेत. तरुणाईला ओपनहायरमला प्रतिसाद मिळतो आहे. दुसरीकडे बार्बी पाहणाऱ्या तरुणींची संख्या काही कमी नाही. सोशल मीडियावर तर बार्बी आणि ओपनहायमर यांच्यातील स्पर्धेवरुन नेटकऱ्यांमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. काहींनी बार्बी किती सुंदर हे सांगितले आहे. तर ओपनहायमधून सत्य घटना कशाप्रकारे समोर आल्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

ओपनहायमर आणि बार्बी यांच्यात सध्याच्या घडीला आकडेवारीनुसार बार्बी बाजी मारताना दिसतो आहे. बॉक्सऑफिसवर आतापर्यत झालेल्या कलेक्शननुसार बार्बीची कमाई ही ओपनहायमरपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्बीनं आतापर्यत जगभरातून ४१.४ मिलियन युएसडी डॉलरची कमाई केली आहे. तर ओपनहायमरची आकडा १५.७ मिलियन युएसडी एवढा आहे. यावरुन दोन्ही चित्रपटांपैकी प्रेक्षकांचा कल कुणाकडे जास्त आहे हे कळून येते.

पण भारतीय बॉक्स ऑफिसकडे पाहिल्यास बार्बीपेक्षा ओपनहायमर कमाईत सरस असल्याचे दिसून येते. भारतातून ओपनहायमरनं आतापर्यत १३.५० कोटींची कमाई केली आहे. तर बार्बीनं फक्त पाच कोटींची कमाई केली आहे. बार्बीला मिळालेलं रेटिंग देखील प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतूरतेनं वाट पाहत होते.

जगभरामध्ये तर बार्बीबाबत चर्चा जास्त होत असून ओपनहायमरची सुरुवात थोडीशी मंदावलेली दिसत आहे. मात्र येत्या काही दिवसांत हा चित्रपट वेगानं भरारी घेईल असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Champions Trophy 2025 : पाकिस्तानात या, खेळा अन् मॅच झाल्यावर झोपायला दिल्लीत जा! PCB चा टीम इंडियासमोर अजब प्रस्ताव

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

SCROLL FOR NEXT