छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक असलेल्या बरखा बिश्त आणि इंद्रनील सेनगुप्ता लग्नाच्या १३ वर्षानंतर वेगळे झाले आहेत. बरखाने अखेर दोन वर्षांनंतर इंद्रनीलसोबत घटस्फोटावर आपले मौन तोडले आहे. तिने सांगितले की, ती मुलगी मीराला सिंगल मदर म्हणून वाढवत आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या ताज्या मुलाखतीत, बरखा बिश्तने इंद्रनीलसोबतच्या घटस्फोटाबद्दल सांगितले आहे. बरखा म्हणाली, “ ते दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण निर्णयांपैकी एक आहे. आपल्या 11 वर्षांच्या मुलीसोबत आयुष्यात पुढे जाताना ती म्हणाली, “मी एक सिंगल मदर आहे आणि मीरा ही माझी प्रायोरिटी आहे. OTT मध्ये मी चांगले काम करत आहे. टीव्ही आणि चित्रपटांमधील चांगल्या प्रकल्पांसाठी मी नेहमीच तयार असते.
मात्र आत्तापर्यंत बरखा बिश्तने तिच्या आणि इंद्रनीलच्या विभक्त होण्यामागचे कारण काय आहे याचा खुलासा केलेला नाही. तसेच याचे कारण सांगण्यासही बरखाने नकार दिला आहे. त्याचबरोबर 2021 मध्ये, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते की इंद्रनीलचे बंगाली अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते, ज्यामुळे त्या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. बरं, कारण अद्याप स्पष्टपणे कळलेले नाही. त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय का घेतला हे फक्त बरखा आणि इंद्रनीललाच माहीत आहे.
एक काळ असा होता की हे दोघे टीव्हीचे आवडते जोडपे होते. ते 2006 मध्ये 'प्यार के दो नाम... एक राधा एक श्याम' च्या सेटवर भेटले होते. बरखा आणि इंद्रनील एकत्र काम करत असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी 2008 मध्ये लग्न केले. नंतर जून 2021 मध्ये इंद्रनील आणि बरखाच्या विभक्त झाल्याची बातमी समोर आल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.