ICC World Cup 2023 Amitabh Bachchan: बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांनी नुकतच भारत vs इंडिया या वादात ट्विट करत पुन्हा चर्चांना कारण दिले. अमिताभ हे सध्या प्रसिद्ध टीव्ही क्विझ शो 'KBC 15' होस्ट करण्यात व्यस्त आहे. मात्र सध्या ते वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. खर तर बिग बींना एक गूड न्यूज मिळाली आहे. ज्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त करत आभार प्रदर्शनाचे ट्विट शेयर केले आहे.
त्याचे झाले असे की, बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी अमिताभ बच्चन यांना 'ICC ODI World Cup 2023' चे गोल्डन तिकीट दिले आहे. अमिताभ आणि क्रिकेट याचा फार जुना संबंध आहे. अमिताभ यांना क्रिकेट खेळायला आवडते. ते बऱ्याचदा क्रिकेट संबधित पोस्ट शेयर करत असतात.
अमिताभ बच्चन हे भारतीय क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. हे लक्षात घेऊन BCCI अध्यक्ष जय शाह यांनी बिग बींना 'ICC ODI World Cup 2023' चे गोल्डन तिकीट भेट दिले आहे. या तिकिटासह त्यांना सर्व सामने लक्झरी तसेच व्हीआयपी स्टँडमधून फ्रीमध्ये पाहता येणार आहे.
बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवर जय शाह यांनी अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकीट देतांनाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेयर करत त्यांनी लिहिले आहे की, "Golden ticket for our golden icons! BCCI सचिव जय शाह यांना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना हे गोल्डन तिकीट देण्याचा बहुमान मिळाला.
एक महान अभिनेता आणि एक क्रिकेट प्रेमी अमिताभ बच्चन यांचा टीम इंडियासाठी दिलेला पाठिंबा आपल्या सर्वांना प्रेरणा देतो.
ICC क्रिकेट विश्वचषक 2023 साठी त्यांना बोर्डात ठेवल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे." तर बीसीसीआयचे हे पुन्हा रिट्विट करत अमिताभ यांनी जय शाह यांचे आभार मानले आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, ते सध्या केबीसीचा शो होस्ट करत आहे. ते शेवटचे 'उंचाई' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते.
यासोबतच ते आर बाल्की यांच्या 'घूमर'मध्ये एक विशेष भूमिका साकारली होती. आता ते नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की 2898 एडिट' यांच्या चित्रपटात दिसणार आहे. यात प्रभास, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.