Beating Elvish Yadav by mob who went to visit Vaishnodevi? The video went viral  SAKAL
मनोरंजन

Elvish Yadav: वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या एल्विश यादवला मारहाण? व्हिडीओ व्हायरल

एल्शिश यादव आणि त्याच्या मित्राला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आलीय

Devendra Jadhav

Elvish Yadav News: बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादव सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. काही दिवसांपुर्वी सापाच्या तस्करी केल्याच्या प्रकरणात एल्विशचं नाव आल्याने चांगलीच खळबळ उडाली. आता एल्विशसोबत एक भयंकर प्रकार घडलाय.

जम्मूला वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या एल्विश आणि त्याच्या मित्रांना भररस्त्यात मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. काय घडलं नेमकं बघा?

वैष्णोदेवीमध्ये एल्विश यादवला गर्दीने घेरले

एल्विश त्याचा मित्र आणि निर्माता राघवसोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेला. व्हायरल व्हिडिओमध्ये एल्विश आणि राघवच्या आसपास गर्दी दिसतेय. काही लोक त्याला कॉलर धरून ओढतानाही दिसत आहेत. टाईम्स नाऊ डिजिटलच्या रिपोर्टनुसार, एका व्यक्तीने एल्विश आणि राघवला त्याच्यासोबत फोटो काढण्यास सांगितले होते, पण दोघांनी नकार दिला. यामुळे त्या व्यक्तीला राग आला आणि त्याने राघवची कॉलर पकडली, तर एल्विश मात्र तिथून पळून गेला.

एल्विशचा स्थानिक लोकांशी वाद

एल्विश यादव आणि राघव शर्मा स्थानिक लोकांशी वाद घालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. आजूबाजूला खूप गर्दी जमली आहे. एका माणसाने राघव शर्माची कॉलर धरली आहे, आणि तो म्हणतोय, 'भाई, हे काय करतोय? तू कोण आहेस?'

तेव्हा राघवची कॉलर पकडणाऱ्या त्या व्यक्तीने तुम्ही येथे गैरवर्तन करत आहात, असे सांगितले. यानंतर तो माणूस राघवला ढकलतो आणि निघून जातो. तर या प्रकरणात एल्विश अगोदरच निघून जातो.

खरं प्रकरण काय?

युजर्सनी हा व्हिडिओ पाहताच एल्विश यादववर आपला राग काढायला सुरुवात केली. पण त्याचे चाहते समर्थनार्थ पुढे आले. चाहत्यांचे म्हणणे आहे की, ज्या व्यक्तीने राघव शर्माची कॉलर पकडली तो व्यक्ती खरंतर एल्विश यादवचा मोठा फॅन आहे आणि त्यांनी एकत्र मजा केली. त्यामुळे फोटो काढायला नकार दिल्याने त्या फॅनला राग आला असावा. आता नेमकं प्रकरण काय हे लवकरच कळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT