Ben Affleck and Jennifer Lopez are engaged now! Google
मनोरंजन

तब्बल 20 वर्षांनी जेनिफर परतली बेन अफ्लेककडे; साखरपुड्याची पोस्ट चर्चेत

जेनिफर लोपेझनं सोशल मीडियावर पोस्ट करीत बेन अफ्लेक या आपल्या जुन्या प्रियकरासोबत साखरपुडा झाल्याचं जाहिर केलं आहे.

प्रणाली मोरे

या दिवसांत लग्नाचा सीझन जोरदार सुरु आहे. सर्वसामान्यांसोबतच मनोरंजन जगतातही स्टार्स एकमेकांसोबत लग्नगाठ बांधताना दिसत आहेत. १४ एप्रिलपासून आलिया(Alia Bhatt)-रणबीर(Ranbir Kapoor) या बॉलीवूडच्या चर्चेतल्या सेलिब्रिटी कपल्सच्या विवाहसोहळ्याला सुरुवात होतेय अशी मोठी बातमी आहे. तर तिकडे हॉलीवूड(Hollywood) मध्येही एका कपलने साखरपुडा उरकून घेतलाय बरं का. हे कपल दुसरं-तिसरं कुणी नसून ते आहेत जेनिफर लोपेझ(Jennifer Lopez) आणि बेन एफ्लेक(Ben Affleck).

.

जेनिफर लोपेझ आणि बेन अफ्लेक गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. जेनिफर लोपेझ ने आपली साखरपुड्याची अंगठी चाहत्यांना दाखवत एक पोस्ट केली आहे,ज्यामुळे दोघांच्या साखरपुड्याची बातमी कन्फर्म झाली आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करताना लिहिलं आहे की,''मला ही घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे''.

अर्थात दोघांनी किती तारखेला साखरपुडा केला याची तारीख अद्याप समोर आलेली नाही. या दोघांना अनेकदा पार्टीज,इव्हेंट,रेड कार्पेट अशा अनेक ठिकाणी एकमेकांसोबत एन्जॉय करताना पाहिलं गेलं आहे. बेन आणि जेनिफर २००२ मध्ये एकमेकांना डेट करीत होते. दोघांनी साखरपुडाही केला होता. पण दोन वर्षांनतर लगेचच ते वेगळे झाले. जेनिफरचं याआधी तीन वेळा लग्न झालेलं आहे. तिनं १९९७ मध्ये ओजानी नोआसोबत लग्न केलं होतं जे एका वर्षातच तुटलं. यानंतर २००१ मध्ये क्रिस जुडसोबत लग्न केलं,जे २ वर्षांत तुटलं. त्यानंतर तिसरं लग्न जेनिफरने मार्क एंथोनीसोबत २००४ मध्ये केलं होतं. ते लग्न १० वर्ष टिकलं पण त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता बेन अफ्लेकशी दुसऱ्यांदा साखरपुडा करीत जेनिफर चौथ्यांदा बोहल्यावर चढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT