Mainak Banerjee Harassment News: बंगाली अभिनेता मेनक बॅनर्जी आणि त्याची पत्नी ऐश्वर्या यांना कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर छळाचा सामना करावा लागला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
मैनक बॅनर्जी आपल्या पत्नीला घेण्यासाठी विमानतळावर गेले होते तेव्हा अभिनेत्याचा बिधाननगर पोलिसांशी वाद झाला. बॅनर्जी यांनी विमानतळावरून फेसबुक लाइव्ह केले आणि धक्कादायक प्रसंग सर्वांना सांगितला.
मैनक बॅनर्जी यांनी सांगितले की ते पत्नीला घेण्यासाठी कोलकाता एअरपोर्ट गेट 1बी समोर आले होते. त्याच्या बायकोचे सामान थोडे जास्त असल्याने गाडीत बसायला थोडा वेळ लागला.
ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्या पत्नीशीही गैरवर्तन सुरू केल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला.
बॅनर्जी दाम्पत्याला पोलिसांनी गाडी घेऊन एअरपोर्ट बाहेर जाऊ दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.
दुसर्या व्हिडिओमध्ये, बंगाली अभिनेत्याने दावा केला आहे की, एका पोलिसाने त्याची कार थांबवली आणि त्याला पोलिस ठाण्यात नेण्याची धमकी दिली. मैनाकने फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये त्या पोलिसाचे नावही सांगितले.
अभिनेता म्हणाला, “काल माझी पत्नी चेन्नईहून विमानतळावर आली. तिने सांगीतल्याप्रमाणे मी तिला रिसीव्ह करण्यासाठी गेट नंबर 1B वर गेलो.
मात्र दुसऱ्या एका पोलिसाने मला माझी गाडी घटनास्थळावरून हटवण्यास सांगितली. मी माझ्या पत्नीला शोधण्यासाठी पुढे गेलो तेव्हा त्या व्यक्तीने मला थांबवण्यासाठी गाडीसमोर उडी मारली.”
दुसर्या व्हिडिओमध्ये, बंगाली अभिनेत्याने दावा केला आहे की, एका पोलिसाने त्याची कार थांबवली आणि त्याला पोलिस ठाण्यात नेण्याची धमकी दिली. मैनकने फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये त्या पोलिसाचे नावही सांगितले.
अभिनेत्याने पुढे दावा केला की घटनास्थळी अधिक वाहने होती, परंतु पोलिसांचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.
पोलिसांनी आमच्यासोबत छळवणूक केली. बॅनर्जी पुढे म्हणाले, “ते माझ्या बायकोशी गैरवर्तन करत होते, त्यामुळे मला माझ्या कारमधून खाली उतरावे लागले. तेव्हाच वाद चिघळला."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.