Bhajan Sopori passes away Bhajan Sopori passes away
मनोरंजन

संतूर वादक भजन सोपोरी यांचे निधन; अनेक दिवसांपासून होते आजारी

सकाळ डिजिटल टीम

संतूर वादक भजन सोपोरी (Bhajan Sopori) यांचे गुरुवारी (ता. २) निधन झाले आहे. गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. संतूरच्या माध्यमातून त्यांनी शास्त्रीय संगीताला नवा आयाम दिला. (Bhajan Sopori passes away)

गुरुवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी आली. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीताची मोठी हानी झाली आहे. ही हानी कधीही भरून काढता येणार नाही. गेल्या महिन्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचेही निधन झाले.

भजन सोपोरी (Bhajan Sopori) यांना योगदानासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय कालिदास पुरस्काराने (Kalidasa Award) सन्मानित करण्यात आले आहे. ते सोपोरी सुफियाना घराण्यातील होते. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर जगात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना कलेसाठी पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता.

परंतु, वयाच्या ७४ व्या वर्षी प्रकृतीने त्यांना साथ देणे थांबवले. यामुळे गुरुग्रामच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. डॉक्टरांनीही शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि संगीत विश्वात मोठी पोकळी सोडली. सोपोनीची कला इतकी जबरदस्त होती की ते संतूरपासून ते सतारपर्यंत सर्व काही वाजवू शकत होते. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतात दुहेरी पदव्युत्तर पदवी घेतली होती. त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीही घेतली होती.

संगीतासोबतच भाषेवरही त्यांची जबरदस्त पकड होती. त्यांना त्यांचे महान उस्ताद पंडित शंकर पंडित जी यांच्याकडून कला मिळाली. शंकर पंडित यांनीच भारतात सुफी बाज शैली लोकप्रिय केली. पुढे सोपोरींनीही ती कला पुढे नेली आणि संतूरला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली. १९५० च्या दशकातच त्यांनी संतूरसह जगभरात सादरीकरण करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या संतूरचे इतके प्रयोग केले की त्यांच्यासाठी एकच वाद्य पुरेसं होतं आणि ते सर्वांची मने जिंकत राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

Paranda Assembly Election : महाराष्ट्राच्या विधानसभेमधून निधी आणण्यासाठी धमक लागते - प्रा. डॉ. तानाजी सावंत

Parli Assembly constituency 2024 : परळी विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच: ना सभा,ना रँली गाठीभेटीने संपला परळी विधानसभेचा प्रचार

SCROLL FOR NEXT