गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरीव विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yevu Dya) ने प्रेक्षकांचं खूप चांगल्या पद्धतीनं मनोरंजन केलं. डॉ.निलेश साबळे,कुशल बद्रिके,भारत गणेशपुरे(Bharat Ganeshpure),श्रेया बुगडे,सागर कारंडे(Sagar Karande) आणि भाऊ कदम अशा सहा जणांच्या टीमनं उत्तम टीम वर्क करीत लोकांच्या मनावर राज्य केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आज या सहा जणांव्यतिरिक्त अनेक इतर कलाकार आले अन् गेले पण या सहा जणांनी मात्र 'चला हवा येऊ द्या' ची साथ कधीच सोडली नाही. पण आता गेल्या काही दिवसांपासून एक बातमी कानावर पडतेय की भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' मध्ये दिसणार नाहीत कारण ते हिंदी कॉमेडी शो मध्ये सहभागी होत आहेत. आता यामुळे त्यांचे मराठी चाहते मात्र दुखावले आहेत. चला जाणून घेऊया,नेमके हे दोघे कुठे चाललेयत,'चला हवा येऊ द्या' खरंच सोडणार का? काय आहे त्यांचा प्लॅन, याविषयी सर्वकाही..(Bharat Ganeshpure And Sagar karande quit chala hawa yevu dya show?)
हो,हे खरं आहे की भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे यांनी हिंदीची वाट धरली आहे. सोनी टी.व्ही(Sony TV) वर नव्यानं सुरू होणाऱ्या एका नवीन कॉमेडी शो(New Comedy Show) मध्ये या दोघांनी सहभाग घेतला आहे. हा शो शनिवार-रविवार या दोन दिवशी टि.व्ही वर प्रदर्शित केला जाणार आहे. सोनी .टिव्ही देखील आपल्या या नव्या शो संदर्भात खूप उत्सुक आहे. खूप दिवसांनी लोकांचे ताणतणाव दूर करण्याची संधी मिळाल्याचं वाहिनीनं म्हटलं आहे. या शो मध्ये जजच्या खूर्चीत विराजमान होणार आहेत अर्चना पुराण सिंग आणि शेखर सुमन. तर शनिवारच्या भागात शो मध्ये शिल्पा शेट्टीच्या 'निकम्मा' सिनेमाची टीम हजेरी लावणार आहेत.
आता थोडं मुळ मुद्द्यावर येऊ या. बातमीत तथ्य आहे की आता हिंदी कॉमेडी शो च्या मंचावर भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे आपल्याला दिसणार आहेत. पण चाहत्यांनी त्यामुळे नाराज वगैरे व्हायचं काहीच कारण नाही. हे आपले मराठी धुरंदर, विनोदाचे मास्टर्स हिंदी कॉमेडी शो चा भाग जरी बनायला चालले असले तरी 'चला हवा येऊ द्या' मधून मात्र ते फारकत घेणार नाहीत बरं का. कारण त्याचं असं आहे की या दोन्ही शो च्या शूटिंगचे दिवस हे वेगळे असल्या कारणानं या दोघांनाही दोन्ही शो,त्याचं शूटिंग आणि त्याच्या वेळा व्यवस्थित हॅंडल करता येणार आहे. त्यामुळे यापुढे उलट या दोघांच्या विनोदाचा बोनस आपल्याला मिळणार आहे. आता ही बातमी ऐकून दोघांचे चाहते मात्र सुखावणार हे नक्की.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.