Bharat Jadhav revealed reason behind why he leave mumbai and shifting in kolhapur sakal
मनोरंजन

Bharat Jadhav: हे शहर आता.. अभिनेता भरत जाधवचा मुंबईला अखेरचा रामराम.. मुक्काम गावी हलवला.. कारण..

भरत जाधवने सांगितलं मुंबई सोडण्यामागचं खरं कारण..

नीलेश अडसूळ

Bharat jadhav: नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वातील नाना माध्यमातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता म्हणजे भरत जाधव. सध्या त्यांचे 'सही रे सही' नाटक जोरदार सुरू आहे. शिवाय 'तू तू मी मी' या नव्या नाटकाचा त्याने नुकताच शुभारंभ केला.

भरत आणि विनोद एक वेगळच समीकरण आहे. मुंबईत वाढलेल्या भरतला चाळीतलं जीवन, साधेपणा याविषयी प्रचंड ओढ आहे. तो साधेपणा त्याने स्वतः वैयक्तिक आयुष्यातही जपला आहे. पण भरतने याच मुंबापुरीला अखेरचा रामराम केला आहे.

हो तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण भरतने मुंबई कायमची सोडून आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या आपल्या गावी कोल्हापूरला राहत असून त्याने हा निर्णय का घेतला यामागचं कारण एका मुलाखतीत सांगितलं आहे.

(Bharat Jadhav revealed reason behind why he leave mumbai and shifting in kolhapur)

काही महिन्यांपूर्वी भरत कुटुंबीयांसह मुंबई सोडून कोल्हापूरला स्थायिक झाला. यामागे नेमकं काय कारण होतं याबाबत तो बोलला आहे. (Bharat jadhav) भरत म्हणाला, ''मुंबई आता बिझनेस हब झाली आहे. मुंबईच्या वेगाशी मला जुळवून घेणं कठीण जातंय. त्यात माझं वय सरत चाललंय.'

' जगण्यासाठी आपल्याजवळ पैसेही हवेत आणि आरोग्याकडेही लक्षही द्यायला हवे म्हणून मी मुंबईबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत काम करून मिळणारे पैसे आणि इथे होणारा खर्च हा सारखाच आहे. खर्च भागवण्यासाठी आपण पैसे कमावतो असे मला वाटू लागले आणि मी हा निर्णय घेतला.'

पुढे तो म्हणाला, 'या सगळ्यासाठी करावी लागणारी धावपळ आता माझ्या वयाला झेपणारी नाही हे मला जाणवले. त्यामुळे पैसे तर कमवायचे पण खर्च कमी करायचा, असे मी ठरवले. या सगळ्या आर्थिक बाबींचा विचार करून मी कोल्हापूरला स्थायिक होण्याचे ठरवले. आणि विशेष म्हणजे आम्ही तिथे राहावे, अशी माझ्या आईची इच्छा होती म्हणून आम्ही कोल्हापूरला आमच्या गावी राहायला आलो.' असे भरत म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT