Bharti Singh speaks about her son 'Gola' Google
मनोरंजन

Bharti Singh ला मुलाकडून आहे खास अपेक्षा; म्हणाली,'१८ वर्षांचा झाल्यावर...'

भारती सिंगने एप्रिल -२०२२ मध्ये आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्याचं नाव तिनं लक्ष्य ठेवलं आहे,जो गोला म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

प्रणाली मोरे

Bharti singh भारती सिंगने एप्रिल महिन्यात आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. तेव्हापासून तिचा गोला(Gola) म्हणजेच लक्ष्य चर्चेत आहे. भारती आणि तिचा पती हर्ष नेहमीच आपल्या मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता भारतीनं मुलाविषयीची एक इच्छा बोलून दाखवली आहे. ती म्हणाली आहे,मुलानं १६-१८ वर्षाचा झाल्यावर काम करायला सुरुवात करायला हवी. भारतीला वाटतं तिच्या मुलाने लक्ष्यने अभ्यासासोबत कामही करायला हवं. इतकंच नाही तर पुढेमागे मुलगी झाल्यावर देखील तिनं तिच्याविषयी डोक्यात प्लॅनिंग करुन ठेवल्याचं म्हटलं आहे. भारती म्हणाली आहे की, तिला खूप बरं वाटेल जर तिच्या मुलांनी अभ्यास करता करता पार्ट टाईम काम केलं.(Bharti Singh wants son Laksh to work at the age of 16-18...)

भारती नेहा धुपियासोबत इन्स्टाग्रामवर लाइव्ह चॅट करत होती. याच चॅट दरम्यान लक्ष्य मोठा झाल्यावर त्यानं काम करण्याविषयी बोलताना भारती म्हणाली,हर्ष आणि मी दोघंही खूप मर्यादित काम घेत आहोत. आता आम्ही नवीन प्रोजेक्ट घेण्याआधी खूप विचार करतो. कामही गरजेचं आहे कारण पैसा हवाच आहे आपल्या गरजेपुरता. मला वाटतं की काही वर्ष आम्ही लक्ष्यच्या गरजा पूर्ण करणं महत्त्वाचं आहे, पण त्यानंतर मात्र त्याने स्वतःच्या गरजेपुरता पैसा कमवायला हवा.

भारती पुढे म्हणाली आहे,जसं अमेरिकेत मुलं शाळेत जातात आणि पार्ट टाईम कामही करतात. मला मुलानं तसंच असावं असं वाटतं. मला वाटतं मुलांनी १६-१८ वर्षाचे झाल्यावर आपल्या पालकांना आर्थिक मदत करायला हवी. भारती म्हणाली, माझ्या मुलानं मॅकडोनल्डमध्ये काम करावं तर मुलीनं सलॉन मध्ये,माझी काहीच हरकत नसेल. मला आनंद होईल माझी मुलं पार्ट टाईम काम करत आहेत,आजकाल मुंबईत आयुष्य जगणं तसंही खूप कठीण झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT