Bhojpuri Actor Khesari Laal Yadav controversy over kicked on temple gate wearing shoes. Google
मनोरंजन

Viral video: शूटिंग असलं म्हणून काय मंदिराच्या दरवाजावर लाथ मारणार..,भोजपूरी अभिनेत्यावर भडकलं पब्लिक

नेहमीच काही ना काही कारणानं वादात सापडणारा भोजपूरी अभिनेता खेसारी लाल यादव आता व्हायरल व्हिडीओमुळे कायद्याच्या कचाट्यात अडकणार असं चित्र दिसत आहे.

प्रणाली मोरे

Viral Video: पुन्हा एकदा भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादव वादात अडकताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. ज्यामध्ये तो एका मंदिराच्या दरवाजावर पायात बूट घालून लाथ मारताना दिसत आहे. आता या व्हिडीओला शूटिंगचा एक भाग म्हणून सांगितलं जात आहे.(Bhojpuri Actor Khesari Laal Yadav controversy over kicked on temple gate wearing shoes.)

वादग्रस्त व्हिडीओनं सोशल मीडियावर नेटकरी भडकणं हे स्वाभाविक आहे. ट्वीटरवर खेसारी लाल यादवच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री पोर्टलवर अभिनेत्याची तक्रार देखील केली आहे. बोललं जात आहे की आता या प्रकरणात खेसारी लाल यादवच्या अडचणी वाढू शकतात. आता अभिनेत्यानं देखील या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. चला,जाणून घेऊया पूर्ण प्रकरण.

हे प्रकरण गोरखपुर येथील पिपराइच नगर पंचायतमधील भगवान मोटेश्वर नाथ मंदिरासंदर्भातलं आहे. व्हायरल व्हिडीओला शूटिंगचा एक भाग असल्याचं म्हटलं जात आहे. त्या व्हिडीओत अभिनेता मंदिराच्या दरवाज्यावर पायात बूट घालून जोरजारात लाथ मारत आतमध्ये घुसताना दिसत आहे. त्यानंतर तो मंदीरात जातो आणि गुंडांची चांगली पिटाई करताना देखील दिसत आहे. पण लोकांचे लक्ष मात्र अभिनेत्यानं मंदिराच्या दरवाज्यावर लाथ मारली आहे तिथेच टिकून राहिलंय. आणि मग यावरनंच जोरदार विरोध सुरु झाला आहे.

लोकांनी खेसारी लाल यादवच्या या व्हिडीओवर आक्षेप घेत हिंदूच्या भावना यामुळे दुखावल्याचं म्हटलं आहे. आता लोकांच्या या विरोधाला पाहिल्यानंतर अभिनेत्यानं यावर आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे. त्यानं म्हटलं आहे की,मंदिराच्या दरवाज्यावर लाथा मारण्यासारखं चुकीचं काम त्याच्याकडून कधीच घडू शकत नाही. त्याला कोणाच्याही भावनांचा अपमान करायचा नव्हता. उलट अभिनेत्यानं आरोप केला आहे की,व्हिडीओला चुकीच्या पद्धतीनं दाखवत व्हायरल केलं जात आहे. खरंतर या सीनमध्ये मंदीराचे दरवाजे खोलण्यासाठी त्यांना रशीनं बांधलं गेलं होतं,ज्याला दोन अन्य लोकांनी खेचून उघडलं.

खेसारी लाल यादवच्या या व्हिडीओला पाहिल्यावर गोरखपुरच्या पिपराइच इथे राहणारे एक रहिवासी प्रकाश पाठक यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या जनसुनवाई नामक पोर्टलवर याची तक्रार केली आहे. तक्रारदारानं मागणी केली आहे की, या प्रकरणात लगेचच चौकशी केली जावी आणि केस दाखल करण्यात यावी. रिपोर्ट्सनुसार या तक्रारीनंतर पिपराइच येथील पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले गेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT