Bhola Movie Review esakal
मनोरंजन

Bhola Movie Review : ॲक्शनच्या डोलाऱ्यावर ‘भोला’चे तांडव

Tushar Maghade

Bhola Ajay Devgan Movie Review : ''रामनवमीच्या पावन मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘लोकेश युनिव्हर्स’च्या प्रसिद्ध कैथी चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘भोला’ चित्रपटाकडून सिनेप्रेमींमध्ये उत्कंठा होती, रिमेक बनविण्याची चटक लागलेले बॉलिवूडवाले ओरिजनल चित्रपटाला किती न्याय देईल, याची अजय देवगणच्या चाहत्यांसह प्रेक्षकांना चिंताच होती. पॉपकॉन तोंडात टाकत नाही, तोपर्यंत एकामागे एक सुरू होणारे ॲक्शन सीन दिपवणारे आहेत.

थ्रीडीमध्ये बघितल्यास सणासुदीला खर्च करून पुरे वसूल झाल्याची दाट भावना येऊ शकते. अभिनय, संगीत, सिनेमॅट्रोग्राफी, दिग्दर्शन सर्वच गोष्टी उत्तम जुळून आल्या आहेत. कैथी चित्रपटाचा ‘आत्मा’ समजून घेण्यात मात्र दिग्दर्शक कमी पडला असला तरी भोला बघितल्यानंतर ‘चलो ये भी ठीक है’ असे वाक्य तोंडातून बाहेर पडतात.''


कहाणी सुरू होते, ती एक पोलिस अधिकारी डायना (तब्बू) व तिची टीम कुख्यात तस्करांचा ड्रग्जचा साठा पकडते. हा ड्रग्जसाठा एका ब्रिटिशकालीन पोलिस ठाण्यात भुयार घरात सुरक्षित ठेवण्यात येतो. तस्करांना याचा सुगावा लागू नये म्हणून ही मोहीम गुप्त राखली जाते. तरी पोलिस दलातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमार्फत तस्करांना याची ‘टीप’ मिळते. दुसरीकडे भोलाची (अजय देवगण) दहा वर्षांनंतर चांगल्या वर्तणुकीमुळे तुरुंगातून सुटका होते.

भोला अनाथाश्रमात असणाऱ्या आपल्या दहा वर्षांच्या मुलीला भेटण्यास आतुर आहे. दुसरीकडे डायना आपल्या वरिष्ठांला मोहिमेची माहिती देण्यासाठी त्यांच्याकडे पोचते, तेथे आधीच या वरिष्ठ अधिकाऱ्याची रिटायरमेंट पार्टी सुरू असते. सगळे पोलिस अधिकारी येथे उपस्थित असतात. याच वेळी तस्करांचा ‘टीपर’ अधिकाऱ्यांच्या ड्रिंक्समध्ये गुंगीचे औषधे मिक्स करतो.

सर्व पोलिस अधिकारी बेशुद्ध पडतात. या पोलिसांच्या जिवाला ड्रग्ज तस्करांकडून धोका आहे. दुसरीकडे तस्करांना जप्त केलेला ड्रग्जचा साठाही मिळावयाचा आहे. बाकी, पुढे काय होते, हे चित्रपटगृहात बघणे आणि अनुभवणे हेच योग्य आहे.

अजय देवगण दिग्दर्शित व मुख्य भूमिका असलेल्या ‘भोला’ चित्रपटात तगडी व अभिनयात वाकबगार कलाकारांची फौज आहे. प्रत्येकाने आपल्या वाटेल्या आलेल्या भूमिका हुबेहुब वठविल्या आहेत. रीमेक बनविताना काही गोष्टींत बदल केला असून, ओरिजनल चित्रपटात पुरुष कलाकाराने केलेली पोलिस अधिकाऱ्याची भूमिका तब्बूने साकारली आहे.

एककाळ पडदा गाजवणारा पण बऱ्याच काळापासून पडद्यावरून लुप्त झालेल्या किरणकुमारचे पाच मिनिटांसाठी का होईना चित्रपटात दर्शन घडते. त्याचबरोबर गुणी कलाकार विनीतकुमार बऱ्याच दिवसाने पडद्यावर दिसला आहे. दोघांच्या छोट्याशा भूमिका असल्या तरी त्यांनी त्या चांगल्या साकारल्या आहेत. दीपक डोब्रियालने विक्षिप्त खलनायक उत्तम रेखाटला आहे. बॅकग्राउंड स्कोर, संगीत कमाल झाली आहेत.

यापूर्वीच ‘आज फिर जिने की तमन्ना है’ या गाण्याचा रीमेकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. हे गाणे बॅकग्राउंडला वापरले असल्यामुळे सीन असरदार झाला आहे. कथा वेगवान राखण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. ‘कैथी’ चित्रपट हा केवळ ॲक्शनच नाही, तर प्रेक्षकांना इमोशनल कनेक्ट करणार होता. पण ‘भोला’ चित्रपटात केवळ ॲक्शन सीनवर अति‘फोकस’ केल्यामुळे हे इमोशनल कनेक्शन ‘वीक’ झाले आहेत.

जे काही भावनिक दृश्‍य आहेत, ते प्रेक्षकांची भावनिक नस दाबण्यात कमी पडतात. बाकी संवाद, तांत्रिक गोष्टी बघून ‘सही है’ म्हणाल्याशिवाय राहवत नाही. चित्रपटाच्या शेवटी ‘सरप्राईज’ असून, या सरप्राईजमधून दुसरा भागही येणार असल्याची झलक दिग्दर्शकाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Kung Fu Pandya! हार्दिक पांड्याचा ट्वेंटी-२०त भीमपराक्रम; असा विक्रम करणारा पहिला भारतीय

Nashik Assembly Election 2024 Result : बंडखोर, मातब्बर अपक्षांना मतदारांनी नाकारले

Viral Video : आत्तेभावाच्या साखरपुड्याच्या पडता पडता वाचली करिष्मा ; पापाराझींना म्हणाली "वो मत डालना"

Kagawad Accident : लग्नासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात दांपत्य ठार, दोन मुलं कोसळली नाल्यात

SCROLL FOR NEXT