Bhubaneswar Infocity Police arrests actress Mousumi Nayak following complaint filed by writer Banamsita Pati  SAKAL
मनोरंजन

Mousumi Nayak: प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी नायकला अटक, समोर आलं धक्कादायक कारण

प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी नायकला पोलिसांनी अटक केलीय

Devendra Jadhav

Mousumi Nayak Arrest News: ओरिया फिल्म इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ओरिया अभिनेत्री मौसमी नायकला पोलिसांनी अटक केली आहे. ओडिशा पोलिसांनी सोमवारी अभिनेत्री मौसमी नायकला एका तरुण महिला लेखिकेला ब्लॅकमेल केल्याबद्दल आणि तिची सार्वजनिक प्रतिमा खराब केल्याबद्दल अटक केली. एवढेच नाही तर मौसमीने लेखिका बनस्मिता पतीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोपही आहे.

काय आहे प्रकरण?

भुवनेश्वरमधील इन्फोसिटी पोलिसांनी लेखिकेच्या तक्रारीच्या आधारे 39 वर्षीय अभिनेत्रीला अटक केली आहे, असे भुवनेश्वर डीसीपी कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की, मौसमी नायकने यापूर्वी लेखिकेविरुद्ध इन्फोसिटी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत असे सांगितले गेले की लेखिकेने मौसमीचे 5.08 लाख रुपये परत केले नाहीत. त्यानंतर, लेखिका आणि मौसमी यांनी तडजोड याचिकेवर स्वाक्षरी केली आणि अभिनेत्रीने आपली तक्रार मागे घेतली.

काही दिवसांनी लेखिकेने मौसमीला पैसेही परत केले होते याशिवाय लेखिकेची प्रतिमा डागाळणारे कोणतेही पाऊल उचलणार नाही, असे आश्वासन मौसमी यांनी दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मात्र, पैसे परत मिळूनही अभिनेत्रीने लेखिका आणि तिच्या कुटुंबियांविरोधात मीडियाला निवेदने दिली आणि चांडका पोलिस ठाण्यात बनस्मिता पतीविरुद्ध खोटा गुन्हाही दाखल केला. मौसमीने लेखिका आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेजही पाठवले होते.

अखेर या सर्व प्रकरणात लेखिकेला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी मौसमी नायकला ओडिशा पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates : राजनाथ सिंह यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल सशस्त्र दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले

Uric Acid Home Remedies: युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास सकाळी रिकाम्यापोटी 'ही' गोष्ट पाण्यात उकळून प्यावी, मिळेल आराम

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT