Bhumi Pednekar -Bheed Movie Intimate Scene Instagram
मनोरंजन

Bheed Movie Intimate Scene: दिग्दर्शकानं भूमीला शूटआधी असा समजावला होता इंटीमेट सीन..'भीड' सिनेमा नाही पण सीन मात्र त्यामुळे गाजतोय..

Bheed Movie Intimate Scene: अनुभव सिन्हा दिग्दर्शित भीड सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाचं कथानक २०१९ मध्ये लागू झालेल्या लॉकडाऊनवर आधारित आहे.

प्रणाली मोरे

Bheed Movie Intimate Scene: अनुभव सिन्हाचा 'भीड' सिनेमा रिलीज झाला आहे. प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद सिनेमाला मिळताना दिसत आहे. पण बॉक्सऑफिसवरची परिस्थिती काहीशी निराशाजनक आहे. अनुभव सिन्हा भूमी पेडणेकर सोबतचा हा पहिला सिनेमा आहे.

भूमीला अनुभव सिन्हाच्या कामाची फारशी ओळख नव्हती ना ती वैयक्तिकरित्या त्याला फार ओळखत होती. पण शूटिंग दरम्यान मात्र अनुभव सिन्हा भूमीच्या अभिनयामुळे तिच्यावर फारच इम्प्रेस झाले होते.

एका मुलाखती दरम्यान अनुभवनं भूमीची प्रशंसा करताना एक किस्सा शेअर केला आहे.(Bhumi Pednekar: Anubhav Sinha sais something awkward to bhumi pednekar before an intimate scene says she did mind blowing job)

अनुभव सिन्हाचा 'भीड' सिनेमा रिलीज झाला आहे. सिनेमाचा विषय २०१९ मध्ये आलेल्या लॉकडाऊनवर आधारित आहे. राजकुमार राव, भूमी पेडणेकर,दिया मिर्झा,आशुतोष राणा आणि पंकज कपूर अशा कलाकारांनी या सिनेमात काम केलं आहे.

रिलीज आधी लल्नटॉप या वेबसाईटशी बातचीत करताना अनुभव सिन्हानं भूमी पेडणेकरची प्रशंसा केली होती. त्यानं सांगितलं की अगदी बेसिक समजावलेलं असतानाही भूमीनं महत्त्वाच्या सीनमध्ये देखील उत्तम परफॉर्मन्स दिला आहे. हा शूटिगचा पहिलाच दिवस होता आणि भूमीनं आपल्या अभिनयानं अभिनवला इम्प्रेस केलं होतं.

अनुभव म्हणाला की,''आम्ही एक सीन शूट करत होतो. हा इंटिमेट सीन होता. शूटचा पहिला दिवस होता तेव्हा मला एक कल्पना सूचली. ज्या खोलीत शूटिंग होत होतं मी तिथे बसू शकत नव्हतो कारण आधीच खूप गर्दी होती''.

'' मी दुसऱ्या खोलीत मॉनिटरवर पाहत होतो. कॅमेरा रोल होणार होता. मी धावत धावत आता गेलो आणि असं बोलून बसलो जे करणं थोडं अवघड होतं''.

जेव्हा अनुभवला तो काय म्हणाला याची विचारणा झाली तेव्हा तो म्हणाला,''मी इथे नाही ते सांगू शकत. खूप अवघड आहे. मी बोललो ते थोडं अजीब होतं''.

अनुभव पुढे म्हणाला,''जेव्हा तुम्ही कोणता इंटिमेट सीन शूट करत असता तेव्हा अभिनेता,अभिनेत्री आणि दिग्दर्शक एकमेकांना थोडंफार ओळखत असतात. तुम्हाला ज्या गोष्टी उघडपणे बोलताना थोडं अवघडल्यासारखं होतं त्या देखील समजावून देताना बोलाव्या लागतात. मी भूमीजवळ गेलो आणि सीन संबंधित तिला जे समजवायचं ते समजवलं. त्यावेळी खरंतर मी तिला नीट ओळखतही नव्हतो''.

अनुभव म्हणाला,''मी समजवल्यावर भूमीनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली,'ओके सर...'

''मी जेव्हा परत मॉनिटरसमोर आलो आणि अॅक्शन बोललो तेव्हा भूमीनं अगदी तसंच केलं जे मला हवं होतं.तिनं असा परफॉर्मन्स दिला आणि मी हे मान्य केलं की या मुलीत काहीतरी आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT