bhumi pednekar  
मनोरंजन

भूमी करतेय कोरोना रुग्णांची मदत; आईला रुग्णालयात पाहिल्यापासून केला निश्चय

मदतीसाठी दररोज येतात १००-१५० कॉल्स

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरला Bhumi Pednekar काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. भूमीसोबतच तिच्या आईलादेखील कोरोना झाला होता. वेळेवर उपचार मिळाल्याने ती आणि तिच्या आईने कोरोनावर मात केली. भूमीच्या आईला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यावेळी भूमी खूप घाबरली होती. तेव्हापासून तिने कोरोना रूग्णांसाठी मदत करण्याचा निश्चय केला आहे. (bhumi pednekar is helping people in the war against corona)

एका मुलाखतीमध्ये भूमीने सांगितले, "मी सोशल मीडियाद्वारे कोरोना रूग्णांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मी एक टीम तयार केली आहे. मी आणि माझी टीम कोरोना रूग्णांसाठी मदत करत आहे. आम्ही गरजूंपर्यंत प्लाज्मादेखील पोहचवत आहेत. आम्हाला कमीत कमी 100 ते 150 लोकांचे रोज मदतीसाठी फोन येतात. अनेक वेळा लोक व्हिडीओ कॉल देखील करतात. मी अनेकांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलते."

कोरोना काळातील अनुभवाबद्दल भूमीने सांगितले, "जेव्हा माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तेव्हा मी आणि माझे कुटुंब होम आयसोलेशनमध्ये होतो. पण जेव्हा माझ्या आईला कोरोनाची लागण झाली तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तेव्हा मी खूप घाबरले होते. त्यानंतर मी ही कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी टीम तयार केली." भूमी तिच्या टिमसोबत कोरोना रूग्णांसाठी प्लाज्मा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड्सची व्यवस्था करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पारा घसरला; आजपासून थंडीचा जोर वाढणार

Rahul Gandhi : मोदींचा डोळा राज्याच्या संपत्तीवर...राहुल गांधी यांचा भाजपवर घणाघात

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

Sakal Podcast: युक्रेनला क्षेपणास्त्र वापरण्याची अमेरिकेनं दिली परवानगी ते बाबा सिद्दीकी हत्येतील मास्टरमाईंडला अटक

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

SCROLL FOR NEXT