TV actor Bhupinder Singh Arrests In Bijnor esakal
मनोरंजन

Bhupindar Singh : टीव्ही अभिनेता भुपिंदरनं केला गोळीबार! पोलिसांकडून अटक, हत्येचा आरोप

युगंधर ताजणे

TV actor Bhupinder Singh Arrests In Bijnor : गोविंद हत्याकांड मध्ये टीव्ही कलाकारांसह आणि दोघांना अटक करण्यात आली आहे. कडक सुरक्षेमध्ये हत्या झालेल्या युवकाचे पार्थिव त्याच्या गावी पाठविण्यात आले असून त्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. पोलिसांनी आता कसून चौकशीला सुरुवात केली आहे.

संबंधित घटनेमध्ये जखमी झालेल्या आरोपींना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कुआखेडा खदरीमध्ये झाड तोडण्यावरुन झालेल्या वादातून गोळीबाराची घटना समोर आली. त्यात पोलिसांनी टीव्ही कलाकारासह त्याच्या नोकराला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय दोन फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Healthy Homes का वाढते आहे आरोग्यपूर्ण घरांची मागणी?

डीआयजी मुनीराज हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेला आहे. रात्री उशिरा गुरदीपचा भाऊ तहरीर यांच्या तक्रारीनुसार भुपेंद्र त्याचा नोकर ज्ञानसिंह, जीवन सिंह आणि गुरजर सिंह यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा ज्ञान सिंहला अटकही केली आहे.

भुपेंद्र सिंहच्या मालिकांविषयी सांगायचे झाल्यास त्यानं काला टीका, एक थी हसीना, कार्तिक पुर्णिमा मालिकांमध्ये काम केले आहे. गोविंदचे पार्थिव हे शवविच्छेदनासाठी त्याच्या हावी कुआखेडा येथे पाठवण्यात आला आहे. यावेळी परिसरातील अनेक पोलीस ठाण्यातील कर्मचारी गावात दाखल झाले आहेत. याविषयी माहिती देताना सीओ नगीना यांनी म्हटले आहे की, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी भुपेंद्रच्या विरोधात कलम ३०२, ३०७, ३२३ आणि ५०४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT