bhuvan bam fans ask him are you from pakisatan because of he very much popular in pakistan karachi sakal
मनोरंजन

Taaza Khabar Trailer: कोथिंबीर आणायला गेला अन् लोक म्हणाले तू पाकिस्तानी आहेस का? भुवन बामचा धमाल किस्सा

भुवन बामची 'ताजा खबर' ही वेब सिरिज सध्या बरीच चर्चेत आहे.

नीलेश अडसूळ

bhuvan bam: आपल्या अजब गाजब शैलीने सोशल मिडियावर हल्लाबोल करणारा इन्फ्लूएंसर, प्रसिद्ध यूट्यूबर भुवन बाम नेहमीच चर्चेत असतो. त्याचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. अगदी भारतातच नाही तर जगभरात त्याची ख्याती आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा भुवन आता अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण करत आहे. त्यांची 'ताजा खबर' ही वेब सिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेब सिरिजची सध्या भलतीच चर्चा आहे.

अनेकांना भुवन का पाकिस्तानचा आहे असे वाटते. त्याविषयी त्याला अनेकदा विचारले गेले आहे. अखेर भुवनने याविषयी एक गंमतीदार किस्सा सांगितला. भुवन म्हणाला, 'मी जेव्हा सोशल मिडियावर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा फक्त फेसबूकवर व्हिडओ उपलोड करत होतो. एक दिवस असा आलं की माझ्या व्हिडिओ वर काही कमेंट दिसल्या. सहज पाहिल्या तर पाकिस्तान, कराची इथून आल्या होत्या. मला आधी ही तांत्रिक अडचण वाटली. पण नंतर त्यांचे पर्सनल मेसेज वाचून धक्काच बसला. कारण तेव्हा मी पाकिस्तानात प्रचंड फेमस होतो, ज्याची मला कल्पना नव्हती. तिथल्या तरुणांमध्ये माझ्या व्हिडिओ व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे अनेकांना मी पाकिस्तानी आहे असाच समज झाला.

पुढे तो म्हणाला, 'एकदा तर मोठा किस्साच झाला.. आईने मला दूध आणि कोथिंबीर आणायला बाजारात पाठवले. मी दुकानदाराकडे खरेदी करत असतानाच एक माणूस आला आणि म्हणाला, तू तोच ना.. जो व्हिडिओ बनवतो.. मी म्हणालो.. हो मीच तो.. पुढे तो माणूस म्हणाला.. तू पाकिस्तानात राहातोस ना मग इथे कसा? त्यावर मी म्हणालो.. अहो मी इथेच राहतो दोन गल्ल्या सोडून.. पाकिस्तानात राहत असतो तर कोथिंबीर घ्यायला इथे आलो असतो का? त्यावर ते काका खूप हसले.'

'त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिल्ली, दिल्लीच्या आसपासचा परिसर याचा उल्लेख करत गेलो. जेणेकरून लोकांना कळेल मी दिल्लीचा आहे. पाकिस्तानचा नाही.' असे तो म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: फुलंब्री विधानसभा संघात अनुराधा चव्हाण 28900 मताने आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT