Big Boss 16 first episode sumbul touqueer khan fails to impress due to less screen time  Google
मनोरंजन

Big Boss 16:विनर म्हणून सुम्बुलकडेच पाहिलं जात होतं,पण पहिल्याच भागात अभिनेत्रीनं खाल्ली माती

छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध मालिका 'इमली' मुळे घराघरात पोहोचलेली सुम्बुल तौकीर बिग बॉसमध्ये येण्याआधीच जोरदार चर्चेत आली होती.

प्रणाली मोरे

Big Boss 16: बिग बॉस १६ ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. एकेक करुन सलमानच्या या शो मध्ये बडे-बडे टी.व्ही स्टार्स सामिल झाले आहेत. कोणी वकील,कोणी मिस इंडिया,कोणी इंजिनिअर तर कोणी रॅपर...प्रत्येक क्षेत्रात माहीर असलेला स्पर्धक यावेळी बिग बॉसचा भाग बनला आहे. पण या सगळ्यांमध्ये दोन चेहरे आहेत,एक म्हणजे सिने-दिग्दर्शक साजिद खान आणि इमली फेम सुम्बुल तौकीर खान,यांची जोरदार चर्चा रंगली आहे. जिथे एकीकडे साजिद खानला बिग बॉसच्या घरात पाहून लोकांच्या रागाचा पारा चढला आहे, तिकडे दुसरीकडे गोड इमली म्हणजे सिम्बुल तौकीरला पाहून लोक खुश झालेयत.

साजिद खानवर 'मी टू' मोहीमेअंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता आणि त्यानंतर त्याच्या विरोधात जोरदार चर्चा रंगली होती. आता जेव्हा तो बिग बॉसचा भाग बनला आहे ते लोकांना मुळीच पटलेलं नाही पण सुम्बुल तौकीरला मात्र लोकांचं प्रेम मिळताना दिसत आहे. इतकंच नाही तर तिच्याकडे शो ची विनर म्हणूनही पाहिलं जात आहे. पण पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात सुम्बुलनं असं कही केलं की ते पाहून लोक हैराण झाले आहेत. असं काय केलं सुम्बुलने? चला जाणून घेऊया विस्तारितपणे.(Big Boss 16 first episode sumbul touqueer khan fails to impress due to less screen time )

पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात कुठल्याच कोपऱ्यात सुम्बुल नजरेस पडली नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्पर्धकानं लोकांच्या नजरेत येण्यासाठी जे काही करावं लागत,म्हणजे हसणं-खिदळणं, मस्ती,भांडण,रुसवा-फुगवा किंवा इतर काहीतरी अॅक्टिव्हिटी..असं काहीच करताना सुम्बुल दिसली नाही. एकार्थानं तिनं बिग बॉसच्या पहिल्याच भागातून लोकांना निराश केलं. येणाऱ्या पुढील भागात जर सुम्बुल अशाच प्रकारे अडगळीत पडून राहिली तर सुम्बुल तौकीरला ते भारी पडणार यात शंकाच नाही. कारण यावेळेस बिग बॉसना थोडी घाई आहे,स्पर्धकांना सक्रिय करण्याची.

बिग बॉस १६ च्या पहिल्या भागात सुम्बुल तौकीर फक्त दोन वेळा दिसली,ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. गौतम विज आणि एमसी स्टेनचं भांडण झालं तेव्हा सुम्बुलनं साजिद खान सोबत मिळून दोघांमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा बिग बॉसनं दिलेल्या टास्कमुळे अर्चना गौतम आणि निमृत कौर अहलूवालियाचं भांडण झालं तेव्हा देखील सुम्बुलनं वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. हे दोन प्रसंग सोडले तर सुम्बुल चं पूर्ण एपिसोडमधलं वावरणं फारच फिकं वाटलं. इतर स्पर्धकांच्या तुलनेत ती खूप कमी वेळा स्क्रीनवर दिसली.

पहिल्या भागात जे स्पर्धक आपली छाप पाडून गेले ते आहेत अब्दू रोजिक,अर्चना गौतम, निमृत कौर अहलूवालिया,मान्या सिंग,टीना दत्ता,साजिद खान,शालिन भनोट. पण सुम्बुल तौकीर यांच्या तुलनेत कुठेच दिसली नाही. याचं एक कारण असू शकतं कदाचित की सुम्बुलला इमलीमध्ये प्रेक्षकांनी नेहमीच चुलबुली अंदाजात पाहिलं आहे. तिच्या मालिकेमुळे ती संपूर्ण देशाची आवडती आहे. तिचा हाच चुलबुली अंदाज आणि मॅच्युरिटी बिग बॉस प्रीमियर वेळेसही दिसला होता. सुम्बुलनं त्यावेळी आपल्या वडीलांची एक कविता देखील वाचून दाखवली होती, ज्यानं प्रत्येकाचं मन जिंकलं होतं. पण बिग बॉसच्या पहिल्या भागात सु्म्बुलचं प्रदर्शन एकदम थंड वाटलं.

सुम्बुलला आता आपली कंबर कसून डोकं चालवत बिग बॉस मध्ये गेम खेळणं गरजेचं आहे. भले ती पहिल्या भागात कमी दिसली पण असे दोन प्रसंग आले ज्यावरनं तिनं चाहत्यांचे मन जिंकले. लोक आतापासून अंदाज लावू लागलेयत की बिग बॉस १६ ची विनर इमली फेम सुम्बुल तौकीरच असेल. पण असं बोललं जात असलं तरी सुम्बुल तौकीर बिग बॉस १६ च्या पहिल्या भागात फार दिसली नाही म्हणून आता तिचे चाहते थोडी कुरकुर करू लागलेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT