sunny leone  
मनोरंजन

वेब सीरिजच्या सेटवर गुंडांचा गोंधळ; सनी लिओनीला सुरक्षित स्थळी हलवलं

स्वाती वेमूल

विक्रम भट्ट यांच्या 'अनामिका' या वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान सेटवर काही गुंडांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर येत आहे. विक्रम भट्ट यांनी अॅक्शन डायरेक्टर अब्बास अली मोघुल यांचे ३८ लाख रुपये थकवल्याने गुंडांनी सेटवर गोंधळ घातला असं म्हटलं जातंय. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, अखेर विक्रम भट्ट यांनी सेटवर येऊन अभिनेत्री सनी लिओनीला सुरक्षित स्थळी हलवलं. त्याचसोबत पुढील शूटिंगसाठी त्यांनी जागा बदलण्याचा निर्णय घेतला. 

अब्बास यांचे पैसे थकवल्याने फायटर्स असोसिएशनच्या काही लोकांनी सेटवर गोंधळ घातला होता. अब्बाल आणि विक्रम भट्ट यांनी आठ शोजसाठी एकत्र काम केलं होतं आणि त्याचेच ३८ लाख रुपये थकवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. या गोंधळमुळे अखेर वेब सीरिजच्या शूटिंगचं ठिकाण बदलावं लागलं. 

विक्रम भट्ट दिग्दर्शित 'अनामिका' या वेब सीरिजमध्ये सनी लिओनी मुख्य भूमिकेत आहे. या सीरिजची पटकथासुद्धा विक्रम भट्ट यांनीच लिहिली आहे. करोना महामारी आणि लॉकडाउनमुळे या वेब सीरिजचं शूटिंग पुढे ढकलण्यात आलं होतं. या सीरिजमध्ये अॅक्शन सीन्सचा भरणा असून सनी लिओनीसुद्धा काही अॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. दहा एपिसोड्सची ही वेब सीरिज एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्ष बदलूनही अपयश आलेल्या नेत्यांची वाटचाल कशी राहणार? वेगळा विचार करण्याशिवाय आता पर्यायच उरला नाही!

Latest Maharashtra News Updates : शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची मातोश्रीवर बैठक

IPL 2025 Mega Auction Highlights: मुंबई इंडियन्सपासून ते CSK पर्यंत, जाणून घ्या कोणत्या संघात कोणते खेळाडू

Jowar-Beet Crackers :थंडीत चविष्ट आणि हेल्दी स्नॅक खावंसं वाटतं? घरच्याघरी बनवा ज्वारी-बिटचे क्रॅकर्स!

Vikas Thackeray : त्सुनामीच्या लाटेत पश्चिमने तारला ‘पंजा’...जनतेची मिळाली ‘विकास’ला साथ

SCROLL FOR NEXT