मनोरंजन

महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत नानावटी रुग्णालयातून आली मोठी अपडेट; कुटूंबियांच्या आरोग्याबाबतही डॉक्टर म्हणाले...

संतोष भिंगार्डे


मुंबई ः महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे तर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि आराध्या यांची प्रकृती वेगाने सुधारत आहे. या आठवडाअखेर किंवा पुढील एक-दोन दिवसांत बच्चन कुटुंबीय रुग्णालयातून घरी परतण्याची शक्यता आहे.

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना ११ जुलै रोजी विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर चारेक दिवसांनी ऐश्वर्या आणि आराध्या यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अमिताभ बच्चन आणि त्यांचे कुटुंबीय लवकरात लवकर घरी परतावे याकरिता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनी होमहवन आणि प्रार्थना केली होती.

अमिताभ आणि अभिषेक यांनी आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते. आता अमिताभ यांच्यासह अभिषेक, ऐश्वर्या, आराध्या यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. येत्या एक-दोन दिवसांमध्ये ते घरी परतण्याची शक्यता आहे.

-------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरातील तपोवन मैदानावर योगी आदित्यनाथांची आज जाहीर सभा

Winter Soup Recipe: हिवाळ्यात सकाळी नाश्त्यात प्या गरमागरम गाजर सूप! शरीर राहील उबदार, लगेच लिहा रेसिपी

Sakal Podcast: फास्ट फूडमुळे अपेंडिक्सचा धोका अधिक ते मोबाइल, लॅपटॉप वापराने टेस्टिंग थंबच्या तक्रारी वाढल्या

आजचे राशिभविष्य - 17 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT