BIgg Boss 13 contestant asim riaz alleges sidharth shukla win was scripted Esakal
मनोरंजन

'Bigg Boss 13 चा विनर सिद्धार्थ शुक्लाच होणार हे आधीच ठरलेलं..', तब्बल 3 वर्षांनी आसिम रियाजचा मोठा खुलासा

बिग बॉस १३ चा सिझन संपून ३ वर्ष उलटली तरी आसिमला आपला पराजय अजूनही मान्य नाही. त्यानं संशयातून केलेल्या मोठ्या वक्तव्यात थेट आरोपही काहीजणांवर केलेयत.

प्रणाली मोरे

Bigg Boss १३: बिग बॉस सिझन १३ मध्ये फर्स्ट रनर अप ठरलेला स्पर्धक आसिम रियाजनं जवळपास ३ वर्षांनी आता एक मोठा खुलासा करत खळबळ उडवली आहे. सिद्धार्थ शुक्लाचं जिंकणं ठरलेलं होतं..असं म्हणून त्यानं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस १३ चा विनर होता आणि शहनाज गिलं सोबतचं त्याचं नातं खूप चर्चेत राहिलं होतं. दुर्दैवानं २ सप्टेंबर २०२१ रोजी त्याला हार्ट अटॅक आल्यानं त्यात त्याचं निधन झालं.

बिग बॉस १३ चा ग्रॅन्ड फिनाले संपल्यानंतर जवळपास ३ वर्षानंतर आसिम रियाज आजही मानतो की त्या सिझनचा विनर तो असू शकला असता. आसिम रियाजचं म्हणणं आहे की बिग बॉस १३ स्क्रिप्टेड होतं..आणि मी जिंकू नये ही मेकर्सची इच्छा होती.

आसिम रियाज म्हणाला की,''माझ्या वेळेस त्यांना वाटत होतं मी जिंकू नये आणि ते त्यांनी घडवून आणलं''.

आसिम रियाज पुढे म्हणाला की,'' त्यांनी १५ मिनिटांसाठी ऑनलाइन वोटिंग ओपन केली आणि ज्याला तुम्हाला जिंकवायचंय त्याला जिंकवा असं त्यावेळी म्हटलं होतं. हे असं करण्यापेक्षा स्पष्ट सांगा ना की तुम्हाला मला जिंकवायचं नव्हतं. मला त्याची खंत नाही. तुम्ही गोष्टी इतक्या घडवून आणल्यात की माझा देखील विश्वास बसला त्या गोष्टींवर. मी देखील त्या निर्णयाचं स्वागत केलं''.

हेही वाचा: डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज यांची खूप भांडणं प्रेक्षकांनी पाहिली पण त्यांच्यात फुललेली मैत्री देखील लोकांनी एन्जॉय केली.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर आसिमनं एक भावूक पोस्ट देखील केली होती. आसिमनंतर त्याचा भाऊ बिग बॉसच्या घरात गेला होता पण आसिमसारखं त्यानं प्रेक्षकांचे हवे तसे मनोरंजन केले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT