Salman Khan- Bidd Boss 16 Host Google
मनोरंजन

Bigg Boss 16 चा कधी आहे फिनाले? जाणून घ्या डेट,टाईम,लाइव्ह स्ट्रीमिंग..सगळं काही एका क्लिकवर

बिग बॉस १६ च्या टॉप ५ मध्ये प्रियंका चाहर चौधरी,अर्चना गौतम,शिव ठाकरे,एमसी स्टेन आणि शालीन भनोट पोहोचले आहेत.

प्रणाली मोरे

Bigg Boss 16 Finale Details: बिग बॉस १६ च्या फिनालेला आता काहीच दिवस बाकी आहेत. १२ फेब्रुवारी रोजी विजेत्याचं नाव घोषित केलं जाईल.

सध्या टॉप ५ मध्ये प्रियंका चाहर चौधरी,अर्चना गौतम,शिव ठाकरे,एमसी स्टेन आणि शालीन भनोट हे आहेत.

जर अजूनही आपल्या मनात शो च्या फिनाले विषयी काही प्रश्न असतील..म्हणजे तो कुठे,किती वाजता दिसणार..तर चला जाणून घेऊया याविषयी सविस्तर.(Bigg Boss 16 Finale Time, date, Live Streaming details)

बिग बॉस १६ चा फिनाले सलमान खान होस्ट करणार आहे. रात्री ९ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत हा फिनालेचा सोहळा रंगणार आहे. हा फिनाले १२ फेब्रुवारीला स्ट्रीम केला जाणार आहे.

या फिनालेच्या सोहळ्याला आपण कलर्स वाहिनीवर पाहू शकता. जर काही कारणानं आपण हा फिनाले टी.व्हीवर पाहू शकला नाहीत तर बिग बॉस लाइव्ह स्ट्रिमिंगचा आनंद देखील घेऊ शकता. यासाठी जिओ टीव्हीवर जाऊन कलर्स चॅनल तिथे पाहू शकता.

याव्यतिरिक्त वूटवर देखील पाहू शकता. पण त्यासाठी आपल्याला याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल.

बिग बॉस १६ मध्ये तुम्हाला जर तुमच्या फेव्हरेट कंटेस्टंटला जिंकताना पहायचं असेल तर आपल्याला त्याला वोट करणं भाग आहे. वोटिंग करण्याची पद्धत खूपच सोपी आहे. यासाठी वूट अॅप किंवा वेबसाईटवर जाऊन आपण वोट करू शकता.

याव्यतिरिक्त MYJio अॅप वर जाऊन देखील आपण वोटिंग करू शकता. अॅपवर जाऊन आपल्याला अतिशय साधी-सोपी प्रोसेस फॉलो करायची आहे. पण यासाठी आपल्याला अॅपवर आपलं एक अकाउंट ओपन करावं लागेल. मग तेव्हाच आपण १२ फेब्रुवारी दुपारी १२ पर्यंत आपण वोट करू शकता.

बिग बॉस ग्रॅंड फिनालेमध्ये लवकरच विजेत्याचं नाव समोर येईल. या क्षणाची सगळेच चातकासारखी वाट पाहत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आलं आहे की,या सिझनच्या विजेत्याला तब्बल २१ लाख ८० हजार एवढी रक्कम मिळणार आहे. ही रक्कम ५० लाख होईल असं बोललं जात होतं..पण तसं केलं गेलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT